LIVE : नाशिक मनपा हद्दीतील शाळा उद्यापासून बंद राहणार

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 01, 2021, 19:30 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:27 (IST)

  पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी श्याम राठोडांनी मानोरा पोलिसात केली तक्रार दाखल, मृत मुलीच्या कुटुंबासह बंजारा समाजाच्या बदनामीचा आरोप; देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, मुनगंटीवारांवर पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल

  20:58 (IST)

  केडीएमसीच्या कोविड सेंटरमधील प्रकार
  उपचारार्थ दाखल केलेल्या महिलेचा विनयभंग
  वॉर्ड बॉयविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

  20:53 (IST)

  CISCE, ICSE बोर्डाचं 10वी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; CISCE, ICSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा 10 मे 2021 पासून सुरू होणार, परीक्षा ऑफलाईन पद्धतीत होणार

  20:41 (IST)

  नाशिक मनपा हद्दीतील शाळा उद्यापासून बंद राहणार, 15 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा मनपा प्रशासनाचा निर्णय, रुग्णसंख्या वाढू लागल्यानं खबरदारीचा उपाय, 15 मार्चला पुन्हा घेणार पुढील आढावा, 5 ते 8, 9 वी आणि 11 वीचे वर्ग बंद, केवळ 10वी आणि 12 वीसाठी पालकांची संमती असेल तर शाळा सुरू राहणार -नाशिक मनपा प्रशासन

  19:54 (IST)

  बेळगाव - मराठी भाषिक पुन्हा रस्त्यावर उतरणार
  8 मार्चला मराठी भाषिकांचा मोर्चा
  वादग्रस्त झेंडा न काढल्यानं मोर्चा काढणार
  बेळगाव मनपासमोर कन्नड संघटनेचा झेंडा
  'तो' ध्वज काढण्याची मराठी भाषिकांची मागणी
  जिल्हा प्रशासन मोर्चाला परवानगी देणार का?
  यापूर्वी दोनवेळा काही कारणांमुळे मोर्चा स्थगित

  19:15 (IST)

  राज्यात दिवसभरात 6,397 नवे रुग्ण
  राज्यात दिवसभरात 5,754 रुग्ण बरे
  राज्यात दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू
  रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 93.94 टक्के
  राज्यात सध्या 77,618 ॲक्टिव्ह रुग्ण

  19:7 (IST)

  मुंबईतील 12 ऑक्टोबरचं बत्ती गुल प्रकरण
  'चीनचा हात असल्याचा न्यूयॉर्क टाइम्सचा दावा'
  'ब्लॅकआऊट प्रकरणाचा चौकशी अहवाल सादर'
  'चीनकडून सायबर हल्ला झाला असण्याची शक्यता'
  'सायबर विभागाच्या अहवालातून काही पुरावे समोर'
  गृहमंत्री अनिल देशमुखांची पत्रकार परिषदेत माहिती

  18:38 (IST)

  जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अर्धा तास चर्चा आणि लक्षवेधीचं कामकाज घ्या; प्रवीण दरेकरांची विधान परिषदेच्या सभापतींकडे आग्रही मागणी

  17:38 (IST)

  ठाण्यात मोठी पाईपलाईन फुटली
  माजिवडा भागात फुटली पाईपलाईन
  पाईपलाईन फुटल्यानं लाखो लीटर पाणी वाया
  पाईपलाईनजवळ सुरू होतं मेट्रोचं काम

  17:3 (IST)

  'पूजा चव्हाण प्रकरणावरून राजकारण नको'
  'सरकार टिकवण्यासाठी मविआचा आटापिटा'
  चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालू नका -पंकजा
  पूजा प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी -पंकजा
  'भाजपनं दबाव आणल्यानं राठोडांचा राजीनामा'
  राजीनामा झाला, आता चौकशी व्हावी -पंकजा
  तपास यंत्रणांनी जलद तपास करावा -पंकजा
  पूजा प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी -पंकजा
  तक्रारदाराचं नाव गुप्त राहायला हवं -पंकजा
  राजकारणातील सध्याचे पायंडे दुर्दैवी -पंकजा
  विदर्भ-मराठवाड्याबाबत भूमिका घ्यावी -पंकजा
  अजित पवारांचं आजचं वक्तव्य चुकीचं -पंकजा
  'धनंजय मुंडेंप्रकरणी माझी भूमिका पूर्वी आहे तीच'
  धनंजय मुंडेंनी स्वत: भूमिका घ्यावी -पंकजा मुंडे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स