LIVE Updates : राज्यात आतापर्यंत एकूण 76 डेल्टा प्लस रूग्णांची नोंद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | August 18, 2021, 22:43 IST
  LAST UPDATED A YEAR AGO

  हाइलाइट्स

  21:33 (IST)

  उल्हासनगर - शॉक लागून 2 कामगारांचा मृत्यू, इमारतीच्या जागेत काम करत असताना दुर्घटना

  20:48 (IST)

  राज्यात दिवसभरात 8196 रुग्ण कोरोनामुक्त
  राज्यात दिवसभरात 5132 नवीन रुग्णांची नोंद
  राज्यात दिवसभरात 158 रुग्णांचा मृत्यू
  राज्यात सध्या 58,069 अॅक्टिव्ह रुग्ण

  20:30 (IST)

  गडचिरोली - जि.प. शिक्षकाला राष्ट्रपती पुरस्कार जाहीर
  अतिदुर्गम आसरल्ली गावच्या खुर्शीद शेख यांचा सन्मान
  देशभरातील 155 शिक्षकांमधून शेख यांची झाली निवड

  19:54 (IST)

  मानव, वन्यजीव संघर्ष टाळण्याच्या उपायांबाबत प्राधान्यानं विचार करा, 

  भारतीय वनसेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

  19:51 (IST)

  'कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका'
  'कोविडविरोधी लढ्यात सर्वांचंच सहकार्य आवश्यक'
  खबरदारी घेण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

  19:12 (IST)

  मुंबई - शासकीय, महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद
  पुरेशा साठ्याअभावी 19, 20 तारखेला लसीकरण बंद
  मुंबईत 21 ऑगस्टला लसीकरण पुन्हा सुरू होणार

  19:6 (IST)

  पुण्यातल्या प्रसिद्ध उद्योगपतींना उडपीमधून अटक
  गणेश गायकवाड, नानासाहेब गायकवाड यांना अटक
  दीड महिन्याच्या तपासानंतर पुणे पोलिसांची कारवाई
  पत्नीला सिगरेटचे चटके देऊन मारहाण केल्याचा गुन्हा
  बलात्कार, खंडणी, जीवे मारण्याच्या प्रयत्नाचेही गुन्हे
  पोलिसांची गायकवाड कुटुंबावर मोक्कानुसार कारवाई
  गायकवाड कुटुंबाची औंधमध्ये कोट्यवधींची मालमत्ता

  18:59 (IST)

  पिंपरी-चिंचवड : स्थायी समिती अध्यक्षांना अटक
  नितीन लांडगेंना एसीबी अधिकाऱ्यांकडून अटक

  18:35 (IST)

  अफगाणिस्तानच्या जलालाबाद शहरात गोळीबार
  आंदोलनावेळी तालिबानी दहशतवाद्यांचं कृत्य
  गोळीबारात 3 जण ठार, 12 हून अधिक जखमी

  18:22 (IST)

  पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात खळबळ
  सर्वसाधारण सभेत एसीबी अधिकाऱ्यांची एन्ट्री
  काही कर्मचाऱ्यांची एसीबीकडून चौकशी
  स्थायी समिती अध्यक्षांचीही एसीबीकडून चौकशी
  नितीन लांडगेंनाही अटक होण्याची शक्यता
  लाचप्रकरणी एसीबीकडून अटकेची शक्यता
  नितीन लांडगेंचा सहभाग निश्चित - राजेंद्र बनसोडे

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स