LIVE Updates : चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोकणाला 3200 कोटींच पॅकेज जाहीर

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 15, 2021, 18:32 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  20:22 (IST)

  'सरकार ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढणार'
  'या पोटनिवडणुकांना हा अध्यादेश लागू होणार नाही'
  निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालीय - प्रा. हरी नरके
  'फेब्रुवारीतील मनपा निवडणुकांसाठी अध्यादेश असावा'
  'अध्यादेश सुप्रीम कोर्टात टिकेलच याची शाश्वती नाही' 
  'मागासवर्ग आयोगामार्फत इम्पिरिकल डेटा गोळा करावा लागेल'
  ओबीसी आरक्षणासाठी हाच ठोस उपाय - प्रा. हरी नरके

  19:37 (IST)

  अध्यादेश काढण्याचा निर्णय योग्य - फडणवीस
  'मविआनं आधीच अध्यादेश काढायला हवा होता'
  सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण - फडणवीस
  अध्यादेश काढून प्रश्न सुटणार नाही - फडणवीस
  'राज्य मागासवर्ग आयोगाकडून अहवालही घ्यावा'

  18:28 (IST)

  102 वी घटना दुरुस्ती गरजेची - विजय वडेट्टीवार
  ओबीसी बांधवांची दिशाभूल नको - वडेट्टीवार
  'जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण देणार'
  ओबीसींचं फार नुकसान होणार नाही - वडेट्टीवार

  18:16 (IST)

  'ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढणार'
  अध्यादेश काढण्यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी
  'तामिळनाडू, आंध्रच्या धर्तीवर अध्यादेश काढणार'
  'आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडणार नाही'
  'हा' अध्यादेश न्यायालयात टिकणार - भुजबळ
  पोटनिवडणुकीला हे आरक्षण लागू होणार - भुजबळ
  'काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आरक्षण मिळेल'
  ओबीसींच्या 10-12% जागा कमी होणार - भुजबळ

  16:13 (IST)

  पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण
  5 आरोपींविरुद्ध दोषारोप निश्चितीस परवानगी
  विरेंद्र तावडे, सचिन अंदुरेचा समावेश
  शरद कळसकर, विक्रम भावेचा समावेश
  यूएपीए कायद्यानुसार कारवाईची शिफारस

  15:56 (IST)

  'दिल्ली पोलिसांनी 6 जणांना अटक केलीय'
  जान शेखला राजस्थानमधून अटक - एटीएस
  जानचा 20 वर्षं जुना रेकॉर्ड आहे - एटीएस
  जान 'डी' कंपनीच्या संपर्कात होता - एटीएस
  जान 9 सप्टेंबरला दिल्लीला जाणार होता - एटीएस
  'तिकिट न मिळाल्यानं जान 13 तारखेला निघाला'
  ही माहिती सेंट्रल एजन्सीची आहे - एटीएस
  आमची टीम दिल्लीला जात आहे - एटीएस
  'आमच्याकडील माहिती दिल्ली पोलिसांना देणार'
  दिल्ली पोलिसांकडील माहिती घेणार - एटीएस
  'जानविरुद्ध पायधुनी पोलिसात 20 वर्षांपूर्वीची केस'
  मुंबईची रेकी झालेली नाही - एटीएस

  14:57 (IST)

  'ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाट?'
  नियमांचं पालन करायला हवं - राजेश टोपे 
  टेस्टिंग मोठ्या प्रमाणात होतंय - राजेश टोपे
  पॉझिटिव्हीटी रेट कमी आहे - राजेश टोपे
  कोरोनावर लसीकरण हाच पर्याय - राजेश टोपे
  '55 टक्के पहिले तर 25 टक्के दुसरे डोस झालेत' 
  केंद्राच्या सूचनेप्रमाणे नियम पाळतोय - टोपे

  13:46 (IST)

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची पत्रकार परिषद
  'दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्यांचं मुंबई कनेक्शन'
  हे प्रकरण अत्यंत संवेदनशील - गृहमंत्री
  'घातपाताच्या संशयावरून काही जणांना अटक'
  महाराष्ट्रातील एका व्यक्तीचा समावेश - गृहमंत्री
  इंटेलिजन्स फेल्युअर नाही - दिलीप वळसे पाटील
  'पोलिसांना त्यांच्या पद्धतीनं तपास करू दिला पाहिजे'
  सर्वांनी पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे - गृहमंत्री
  हा राजकारणाचा विषय नाही - दिलीप वळसे पाटील
  संपूर्ण घटनेवर एटीएस प्रमुखांचं लक्ष - गृहमंत्री
  एटीएस प्रमुखांची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद
  पत्रकार परिषदेत अधिकारी माहिती देतील - गृहमंत्री

  12:25 (IST)

  पकडलेल्या दहशतवाद्यांबाबत सर्वात मोठी बातमी
  पाक सैन्याच्या अधिकाऱ्यांकडून दहशतवाद्यांना ट्रेनिंग
  कसाबला ट्रेनिंग दिलेल्या ठिकाणी दहशतवाद्यांना ट्रेनिंग
  आत्मघाती हल्ल्याचं, लोकांना ओलीस ठेवण्याचं ट्रेनिंग
  एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले करण्याचं दिलं ट्रेनिंग
  महत्वाची कार्यालयं टार्गेटवर, तपास यंत्रणांना संशय
  दिल्लीतील 3 तर मुंबईतील 2 ठिकाणं होती टार्गेटवर 

  12:25 (IST)

  दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर महाराष्ट्र एटीएसला जाग
  दहशतवादी जानच्या संपर्कातील लोकांना घेतलं ताब्यात
  एटीएसनं जान शेखच्या हालचालींची काढली माहिती
  जानसाठी रेल्वे तिकीट बुक करणारा पोलिसांच्या ताब्यात
  जानसोबत आणखी एकाचं तिकीट केलं होतं आरक्षित
  पोलिसांनी ट्रॅव्हल एजंट असगरला घेतलं ताब्यात
  जानसोबतची 'ती' व्यक्ती कोण? एटीएसकडून शोध सुरू

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स