• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • LIVE Updates: औरंगाबादच्या नागद घाटात दरड कोसळली

LIVE Updates: औरंगाबादच्या नागद घाटात दरड कोसळली

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 07, 2021, 14:51 IST
  LAST UPDATED 8 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  21:46 (IST)

  पुढील 2 दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा अलर्ट

  20:40 (IST)

  अफगाणमध्ये तालिबानची नव्या सरकारची घोषणा
  मुल्ला मोहम्मद हसन अखुंदजादा पंतप्रधान
  अब्दुल गनी बरादर अफगाणचे उपपंतप्रधान
  मुल्ला याकूबकडे संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी
  सिराजुद्दीन हक्कानीकडे गृहमंत्रिपदाची धुरा
  खैरउल्लाह खैरख्वाकडे प्रसारण खात्याची जबाबदारी
  अब्दुल हकीमकडे कायदे मंत्रालयाची जबाबदारी

  20:18 (IST)

  25 सप्टेंबरला केंद्रीय सहकार मंत्रालयाचा पहिला कार्यक्रम
  अमित शाहांच्या उपस्थितीत राष्ट्रीय सहकार परिषद
  सहकार क्षेत्रातील 2 हजार पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देणार
  साखर, दूध, बँका या सर्व विषयांवर एकत्र होणार मंथन

  19:57 (IST)

  बेकायदेशीर कारवाई करणाऱ्यांना राणेंचा इशारा
  'त्या' अधिकाऱ्यांना कोर्टात खेचणार - नारायण राणे
  'कोर्टात खेचण्यासाठी आमच्या वकिलांची तयारी'
  केंद्रीय मंत्री नारायण राणेंची दिल्लीत माहिती
  'बेळगाव निकालाचं अनुकरण मुंबई पालिकेत होणार'

  18:40 (IST)

  कोकणवासीयांसाठी नारायण राणेंची मोठी घोषणा
  'चिपी विमानतळावरून विमान वाहतूक सुरू होणार'
  9 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं उद‌्घाटन - राणे
  सिंधुदुर्ग ते मुंबई विमानसेवा - नारायण राणे
  मी संबंधित मंत्र्यांशी बोललो - नारायण राणे
  कुणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये - राणे
  'कोकणात एक प्रकल्प जाहीर केला का हे सांगावं'
  केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा शिवसेनेवर निशाणा
  हिंदूंच्या सणांना बंदी का? राणेंचा सरकारला सवाल

  18:11 (IST)

  पुणे - वानवडीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण
  वानवडी पोलिसांकडून आणखी 6 जणांना अटक
  13 जणांनी केला होता अल्पवयीन मुलीवर बलात्कार

  17:30 (IST)

  रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट
  गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकणात जोरदार पाऊस
  मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा
  उद्या पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट

  17:0 (IST)

  वानवडीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण
  'बलात्काराची घटना लाजिरवाणी आणि संतापजनक'
  पोलिसांकडून आरोपींना तातडीनं अटक - अजित पवार
  आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल - अजित पवार
  'माणुसकीला काळिमा फासणारी घटना पुन्हा नको'
  अजित पवारांचे पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश

  16:22 (IST)

  मराठा आरक्षणाबाबत 'वर्षा'वरील बैठक संपन्न
  मुख्यमंत्र्यांसोबत मराठा आरक्षणावर चर्चा - मेटे
  आरक्षण कसं देता येईल यावर बैठकीत चर्चा - मेटे
  'कायदेशीर, सामाजिक लोकांशी चर्चा करणार'
  'ओबीसींप्रमाणे सवलतीसाठी माहिती मागवणार'
  अनेकांच्या नोकरीचा मार्ग मोकळा करणार - मेटे
  'शिवस्मारकाबाबतचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न'
  UPSC विद्यार्थ्यांसाठी होस्टेलची सोय करणार - मेटे
  अण्णासाहेब महामंडळामार्फत थेट कर्ज - मेटे
  विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज 5 लाखांपर्यंत - मेटे
  मेडिकलच्या विद्यार्थ्यांना 10 लाख कर्ज देणार - मेटे
  'शिवाजी महाराज भवनांतर्गत योजना राबवणार'
  आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील - मेटे
  'कोपर्डी, तांबडी प्रकरणी त्वरित अंमलबजावणी करणार'
  हा निर्णय आहे, पोकळ आश्वासन नाही - विनायक मेटे

  15:59 (IST)

  पुणे - वानवडीतील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण, मेधा कुलकर्णींनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट, नराधम आरोपींवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स