• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Live Updates : पुण्यात दिवसभरात 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात शुन्य मृत्यूची नोंद

Live Updates : पुण्यात दिवसभरात 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात शुन्य मृत्यूची नोंद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | March 07, 2022, 20:23 IST
  LAST UPDATED 5 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:23 (IST)

  केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत कार्गो पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी भारतीय 

  विमानतळ प्राधिकरणाला बीएसवो यार्डलगतची 13 एकर जमीन देण्यास मान्यता, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं ट्विट

  22:2 (IST)

  नवी मुंबई मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा
  शासकीय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज
  महापालिकेला सवलतीच्या दरात भूखंड मिळणार
  नगरविकास विभागाच्या सिडकोला सूचना
  'भूखंडाचा दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात यावा'
  भाजप आमदार मंदा म्हात्रेंनी केली होती मागणी

  21:18 (IST)

  ममता बॅनर्जी विमान अपघातातून बचावल्या
  दोन विमानं आली होती समोरासमोर
  प.बंगालच्या मुख्यमंत्री अपघातातून बचावल्या

  21:2 (IST)

  नवी मुंबईतील शासकीय रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजचा मार्ग मोकळा

  महापालिकेला सवलतीच्या दरात भूखंड देण्याच्या सिडकोला सूचना

  विधानभवनात बोलावलेल्या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश

  भूखंडाचा दर 50 टक्क्यांनी कमी करण्यात यावा.. 

  भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सरकारकडे केली होती मागणी

  नगरविकास विभागाच्या निर्णयामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा

  20:54 (IST)

  - महिला दिनाच्या पुर्व संध्येला मुंबई पोलिसाचे कृत्य 
  - बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ३७ लाख रुपयांची लाच 
  - तक्रारार महिलेची समजूत काढून गुन्हा दाखल करु देणार नाही अशी दिली होती ग्वाही
  - स्वतःकरता ५ लाख रुपये 
  - वरीष्ठ पोलिस अधिका-याकरता २ लाख रुपये 
  - आणि तक्रारदार महिले करता ३० लाख रुपये मागितली होती लाच
  - यापैकी ७ लाख रुपये लाच घेताना केली रंगेहाथ अटक 
  - मुंबई लाच लुचपत प्रतिबंध विभागाने केली कारवाई 
  - पोलिस उपनिरीक्षक भरत मुंढेला केली अटक 
  - वरीष्ठांची चौकशी सुरु

  20:51 (IST)

  5 राज्यांतील विधानसभेचा 10 मार्चला फैसला
  यूपी, गोवा, पंजाबमध्ये कोण मारणार बाजी?
  उत्तराखंड, मणिपूरमध्ये कुणाचं सरकार?
  एक्झिट पोलनुसार सत्तेच्या चाव्या कुणाकडे?
  विविध एक्झिट पोलनुसार कुणाची आघाडी?
  उत्तर प्रदेशचा गड भाजप राखणार - सर्व्हे
  उत्तर प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत - सर्व्हे
  योगी सरकार कायम राहणार - एक्झिट पोल
  300 च्या खाली संख्याबळ घटण्याचा अंदाज
  पंजाबमध्ये आम आदमी पार्टीची मुसंडी - सर्व्हे
  गोव्यात भाजप-कॉंग्रेसमध्ये 'कॉंटे की टक्कर'
  उत्तराखंडमध्ये कॉंग्रेस-भाजपात चढाओढ
  मणिपूरमध्ये भाजपच्या सत्तेची शक्यता - सर्व्हे

  20:36 (IST)

  कोल्हापूर - ए, बी आणि ई वॉर्डमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा, शिंगणापूर उपसा केंद्राच्या पंपात बिघाड, पंप दुरुस्त होईपर्यंत होणार दिवसाआड पाणीपुरवठा, उपनगरं आणि ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्यावरही परिणाम

  20:31 (IST)

  कोल्हापूर :

  ए, बी आणि ई वार्ड मध्ये दिवसाआड पाणी पुरवठा

  शिंगणापूर उपसा केंद्राच्या पंपात बिघाड

  पंप दुरुस्त होईपर्यंत होणार दिवसाआड पाणी पुरवठा

  उपनगरे आणि ग्रामीण भागाच्या पाणी पुरवठ्यावरही परिणाम

  20:18 (IST)

  पुण्यात दिवसभरात 29 नव्या कोरोनाबाधितांचा वाढ
  तर 44 जणांना डिस्चार्ज
  दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही

  19:15 (IST)

  पुणे - महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला अंतिम मंजुरी, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्याला मोठं यश, यंदाच्याच वर्षी 100 प्रवेश करण्यास मान्यता, एनएमसीकडून अंतिम मंजुरीचं पत्र महापालिकेला प्राप्त

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स