LIVE Updates : FRP 3 टप्प्यात देण्याची शिफारस शरद पवारांच्या डोक्यातूनच आली, सदाभाऊ खोतांचा आरोप

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | October 05, 2021, 22:57 IST |
  LAST UPDATED 2 YEARS AGO

  हाइलाइट्स

  21:41 (IST)

  येत्या शनिवारपासून राज्यात भाजपचं ओबीसी जागर अभियान, 9 ऑक्टोबरला पंढरपूरमधून अभियान सुरू होणार, त्यानंतर नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा ठिकाणी मेळावे होणार तर नागपूरला होणार समारोप, ओबीसी नेतृत्व करणारे अनेक भाजपचे नेते ओबीसी समाजाचे मुद्दे मांडणार

  21:36 (IST)

  पुणे शहर पोलीस भरती 2019 लेखी परीक्षा
  लेखी परीक्षेवेळी 3 तोतया उमेदवारांना अटक
  याप्रकरणी तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
  तिघांपैकी 2 औरंगाबादेतील, एकजण जालन्यातील

  20:10 (IST)

  कृष्णानगरच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी गाळेधारक, रहिवाशांचं पुनर्वसन करूनच जागा घ्या, कोरेगावचे आमदार महेश शिंदेंनी मांडलेल्या वस्तुस्थितीवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश

  19:51 (IST)

  पुणे - लोहगाव विमानतळ 14 दिवसांसाठी बंद राहणार
  रनवेच्या कामामुळे विमानतळ 14 दिवसांसाठी बंद
  '16 ते 29 ऑक्टोबरपर्यंत विमानतळ बंद ठेवणार'
  एअरपोर्ट डायरेक्टर संतोष ढोके यांनी दिली माहिती

  19:22 (IST)

  '2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये भाग घेणार नाही'
  'भारतीय हॉकी संघ प्रतिनिधित्व करणार नाही'
  कॉमनवेल्थमध्ये न खेळण्याचा भारतीय हॉकी संघाचा निर्णय
  कोरोनाची स्थिती, क्वारंटाईन नियमामुळे निर्णय

  18:22 (IST)

  अंमली पदार्थ, चरस, गांजा प्रकरणी चौघांना अटक
  चारही आरोपींना 11 तारखेपर्यंत एनसीबी कोठडी
  श्रेयस नायर, मनीष दर्याला एनसीबी कोठडी
  अविन साहू, अब्दुल कादीर शेखला एनसीबी कोठडी

  17:59 (IST)

  जि.प., पं.स. पोटनिवडणुकीसाठीचं मतदान संपलं
  मतदारराजाचा कौल कुणाला? उद्या मतमोजणी

  17:52 (IST)

  प्रियांका गांधींना केंद्रानं अडवणं चुकीचं - एच.के. पाटील
  देशात इंधन दरासह महागाई वाढतेय - एच.के. पाटील
  अनेकांचे रोजगार गेले, छोटे व्यवसाय अडचणीत - पाटील

  17:28 (IST)

  7 तारखेपासून सिद्धिविनायक मंदिर खुलं होणार
  क्यूआर कोड दाखवल्यानंतर मंदिरात प्रवेश
  मंदिरात प्रवेशावेळी नियमावलीचं पालन सक्तीचं
  दर गुरुवारी आठवड्याचे क्यूआर कोड देणार

  17:15 (IST)

  संजय राऊतांनी घेतली राहुल गांधींची भेट
  'राहुल गांधींशी देशातील सद्यस्थितीवर चर्चा'
  'दोघांमधील चर्चा सार्वजनिक करणार नाही'
  देशात लोकशाही राहिली नाही - संजय राऊत 

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स