liveLIVE NOW

Live Updates: लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर शिवसेना भवनासमोर ढोल ताशे वाजवून जल्लोष

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | November 02, 2021, 16:54 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED A MONTH AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:33 (IST)
  अकोल्यातील पातूर रोडवर दीड हजार लीटर बायोडिझेलच्या अवैध साठ्यावर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा; बायोडिझेलचा साठा आणि 2 ट्रक जप्त, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतलं ताब्यात
  21:30 (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही, प्रसिद्धी माध्यमांमध्ये पेरलेलं वृत्त निराधार, आयकर विभागाच्या कारवाईशी अजित पवारांचा काहीही संबंध नाही, आयकर विभागाकडून प्राप्त पत्राला कायदेशीर प्रक्रियेनं उत्तर देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वकिलांची माहिती

  21:0 (IST)

  अमरिंदर सिंहांचा काँग्रेसला अधिकृतपणे रामराम
  कॅप्टन अमरिंदर यांनी नवा पक्ष स्थापन केला
  पंजाब लोक काँग्रेस पार्टीची केली घोषणा

  20:43 (IST)

  'राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण करा'
  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून जिल्हाधिकाऱ्यांना उद्दिष्ट
  नागरिकांना दोन्ही डोसेस घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

  18:11 (IST)

  उरण-पनवेल मार्गावर जासई इथं गर्डर कोसळला
  पुलाच्या बांधकामातील लोखंडी सांगाडा कोसळला
  5 जण जखमी, जखमींपैकी एकजण गंभीर जखमी
  सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात केलं दाखल

  17:36 (IST)

  ए विभाग परिसरातील 3 इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशनचं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न, हुतात्मा चौक, काळाघोडा चौक, राम्पार्ट पदपथ या 3 ठिकाणी सशुल्क वाहनतळांवर उपलब्ध होणार सुविधा, सुरुवातीच्या 3 महिन्यांसाठी विनामूल्य चार्जिंग सुविधा

  17:33 (IST)

  'बोगस बायोडिझेल प्रकरणी 8 दिवसांत 4 ठिकाणी छापे'
  40 ते 50 लाखांचा मुद्देमाल केला जप्त - मनोज पाटील
  'या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 11 आरोपींना अटक'
  नगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटलांची माहिती

  17:27 (IST)

  अमरिंदर सिंह यांचा काँग्रेसला अधिकृतपणे रामराम
  पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह
  काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा, सोनियांना पाठवलं पत्र
  कॅप्टन अमरिंदर सिंह नवीन पक्षाची स्थापना करणार
  'पंजाब लोक काँग्रेस' असं नाव असण्याची शक्यता
  अमरिंदर यांनी 3 नावांचा प्रस्ताव आयोगाकडे दिला

  17:19 (IST)

  अहमदनगर - बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री करणारे आरोपी 1,75,40,500 किमतीच्या मुद्देमालासह नगर-सोलापूर रोडवरील वाटेफळ शिवारातून जेरबंद; उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामीण विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

  17:13 (IST)

  आम्ही पराभव स्वीकारतो - प्रवीण दरेकर
  'संजय राऊतांना राष्ट्रीय राजकारणासाठी शुभेच्छा'
  'राज्यातील एक पक्ष राष्ट्रीय राजकारणात पुढे जातोय'
  'कायद्याचा अभ्यास न करता काही लोक बोलतात'
  न्यायव्यवस्थेवर विश्वास असायला हवा - प्रवीण दरेकर
  'आयकर विभागाला काही पुरावे सापडले असतील'
  'म्हणून त्यांनी काही प्रॉपर्टी अटॅच केल्या असतील'
  थोडा संयम दाखवायला हवा - प्रवीण दरेकर
  बॉम्ब फुटण्याची इतकी का घाई आहे? - दरेकर

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स