मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

maharashtra corona update : राज्यात 47 हजार कोरोनाबाधित रुग्णांची भर, 155 जणांचा मृत्यू

maharashtra corona update : राज्यात 47 हजार कोरोनाबाधित रुग्णांची भर, 155 जणांचा मृत्यू

आज 26,252 रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहे. तर एकूण 25,49,075 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे

आज 26,252 रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहे. तर एकूण 25,49,075 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे

आज 26,252 रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहे. तर एकूण 25,49,075 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 05 एप्रिल : राज्यात कोरोनाचा (maharashtra corona update) उद्रेक झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पार पोहोचली होती. पण, आज मात्र संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 47,288 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 155 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्य सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जाहीर करण्यात आली आहे. आज 26,252 रुग्ण बरे होऊन घरी पोहोचले आहे. तर एकूण 25,49,075 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.36% एवढे झाले आहे.

पुण्यातला थरार: लेडी डॉनने साथीदारांच्या मदतीने केली प्रियकराचीच हत्या

आज राज्यात 47,288 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 155 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.86% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,07,15,793 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 30,56,885 (14.76 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 24,16,981 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 20,115 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. तर राज्यात आज 4,51,375 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आंबेगावात गाजा वाजा, दिलीपराव एकच राजा! बँकेची निवडणूक ते गृहमंत्रिपदाचा प्रवास

दरम्यान, राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. या काळात राज्य सरकारकडून एक नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, या नियामवलीमध्ये आता थोडे बदल करण्यात आले आहे.

रविवारी 4 एप्रिल रोजी 'ब्रेक दि चेन'च्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा (Essential Services) उल्लेख करण्यात आला होता. त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आला आहे.

आता या सेवा देखील आवश्यक सेवेत

1. पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने

2. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा

3. डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी - माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा

4. शासकीय व खासगी सुरक्षा सेवा

5. फळविक्रेते

खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर 15 दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंड घेण्यात येईल.

- सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स

रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स,

- सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे,

- सर्व मायक्रो फायनान्स संस्था

- सर्व वकिलांची कार्यालये

- कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)

- ज्या व्यक्ती रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे, बसेस, विमानं यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकिट बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.

- औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री 8 तर सकाळी 7 या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल.

- एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल.

- परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास रात्री 8 नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.

- आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर  परवानगी देईल.

- घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री 8 नंतर ये जा करण्याच्या बाबतीत  स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल.

रात्री 8 नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

First published: