liveLIVE NOW

LIVE Updates : नाशिकमध्ये करन्सी नोट प्रेसमध्ये कामगारांनी पुकारला बंद

कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स

 • News18 Lokmat
 • | September 01, 2021, 00:00 IST
  facebookTwitterLinkedin
  LAST UPDATED 3 MONTHS AGO

  AUTO-REFRESH

  HIGHLIGHTS

  21:29 (IST)

  स्वत:चं जात प्रमाणपत्र नाही अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना इ.11 वी प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ नये यासाठी 30 दिवसांची मुदत, विद्यार्थ्यांना आपल्या वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करून तात्पुरता प्रवेश घेण्याची सोय, शालेय शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

  20:28 (IST)

  राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पडली पार
  राष्ट्रवादी मंत्र्यांच्या कामकाजाचा बैठकीत आढावा
  'स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका फेब्रुवारीत'
  प्रत्येक नेत्याला एक दिला जिल्हा - नवाब मलिक
  'महामंडळ नेमणुकीवर राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा'
  15 दिवसांमध्ये नावं जाहीर करणार - नवाब मलिक
  'ओबीसी आरक्षण सुटेपर्यंत निवडणूक नको'
  ही आमची देखील भूमिका आहे - नवाब मलिक

  20:20 (IST)

  मुंबईत दहीहंडी साजरी करणाऱ्यांविरोधात कारवाई, आतापर्यंत 9 ठिकाणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

  19:42 (IST)

  पंढरपूर तालुक्यातील 7 गावांत उद्यापासून संचारबंदी
  1 सप्टेंबरपासून 14 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर
  वाखरी,तिसंगी,शेळवे,सोनके,सिद्धेवाडीत कडक निर्बंध
  कान्हापुरी, पिराची कुरोली या गावांमध्ये निर्बंध जाहीर

  19:36 (IST)

  नाशिक - करन्सी नोट प्रेसमध्ये कामगारांनी पुकारला बंद, नोटांची छपाई झाली बंद, व्यवस्थापनाच्या मनमानी कारभाराविरोधात काम बंदचं उपसलं हत्यार, कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाहीतर बेमुदत आंदोलनाचा इशारा, बंडल गहाळ प्रकरणी कारवाई झालेल्या कामगारांना पुन्हा कामावर घेण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन

  19:22 (IST)

  पुणे - पतीनं न विचारता पाणीपुरी आणल्यानं भांडण, पत्नीची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना, पती गहिनीनाथ सरवदेला पोलिसांकडून अटक

  19:1 (IST)

  भारतात दुसऱ्यांदा 24 तासांत एक कोटी लसीकरण

  18:24 (IST)

  औरंगाबाद-धुळे महामार्गावरील वाहतूककोंडी फुटली
  16 तासांनंतर घाटात अडकलेल्या वाहनधारकांना दिलासा
  दरडीमध्ये अडकलेल्या मालवाहू ट्रकला काढलं बाहेर

  17:34 (IST)

  पुणे - एकदिवसीय लसीकरणाचा नवा रेकॉर्ड
  पुणे जिल्ह्यात आज तब्बल 2 लाख डोस टोचले
  आतापर्यंत तब्बल 80 लाख डोसचं लसीकरण पूर्ण
  राज्यातला कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम
  पुणे झेडपी सीईओ आयुष प्रसाद यांची माहिती
  CSR फंडातून झेडपीला मिळाले होते दीड लाख डोस
  लसीकरणात पुणे जिल्हा महाराष्ट्रात अव्वल

  17:18 (IST)

  मविआ समन्वय समितीची 'सह्याद्री'वर झाली बैठक
  कन्नड तालुक्यात अतिवृष्टी आणि घाटात भूस्खलन
  उद‌्भवलेल्या परिस्थितीचा राज्य सरकारकडून आढावा
  घाटातील वाहतूक पूर्ववत करा, प्रशासनाला सूचना
  'नुकसानग्रस्त भागात तात्काळ मदत पोहोचवा'
  'पीडितांना जीवनावश्यक वस्तू, आर्थिक मदत द्या'
  बैठकीला अजित पवार, सुभाष देसाई होते उपस्थित
  बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणही होते उपस्थित

  कोरोना आणि राज्यासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे ताजे अपडेट्स