मुंबई, 30 मे: राज्यात कोरोनाच्या (Corona in Maharashtra) दुसऱ्या लाटेने अक्षरश: थैमान घातले होते. दैनंदिन रुग्णसंख्येतही प्रचंड मोठी वाढ होत होते. मात्र, राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येत घसरण होत असून रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ (recovery rate increasing) होत आहे. आज राज्यात 22,532 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 53,62,370 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.55 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 18,600 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात सध्या 2,71,801 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,48,61,608 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 57,31,815 म्हणजेच 16.44 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
तीन महिन्यात पहिल्यांदाच पुण्याने तोडला रेकॉर्ड; कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल
राज्यात आज 402 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 272 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 130 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यातील मृत्यू दर 1.65 टक्के इतका आहे.
पाहूयात आज कुठल्या विभागात किती रुग्णांचे निदान
ठाणे - 3110
नाशिक - 1947
पुणे - 4817
कोल्हापूर - 4125
औरंगाबाद - 650
लातूर - 976
अकोला - 1784
नागपूर - 1191
एकूण - 18600
सर्वाधिक सक्रिय रुग्ण असलेले जिल्हे
सर्वाधिक सक्रिय रुग्ण हे पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 39,466 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत 28,015 सक्रिय रुग्ण आहेत. तर साताऱ्यात एकूण 21,625 सक्रिय रुग्ण आहेत.
पुणे जिल्हा - 39,466
मुंबई - 28,015
सातारा - 21625
ठाणे - 19,306
कोल्हापूर - 17,862
राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला
राज्यातील कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर निर्बंध लागू केले. या निर्बंधांचा सकारात्मक परिणाम राज्यात दिसून आला आणि वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला तसेच रिकव्हरी रेटही वाढू लागला. मात्र काही जिल्ह्यांत रुग्णवाढ अद्यापही असल्याने राज्य सरकारने 15 दिवसांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय़ घेतला आहे. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Maharashtra