Home /News /mumbai /

महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार का? राजेश टोपेंनी सांगितला नवा पर्याय

महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार का? राजेश टोपेंनी सांगितला नवा पर्याय

कोविड संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्यात. अमित शहा यांनी ही वाढत्या कोरोना केस संदर्भात सूचना दिल्या आहेत.

    मुंबई, 18 मार्च :  महाराष्ट्रात कोरोनाबाधित (Maharashtra Corona update) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagapur), अमरावतीसह काही शहरांमध्ये अंशत: लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का अशी चर्चा सुरू आहे. पण, राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार नाही, कडक निर्बंध लावले जातील, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी स्पष्ट केलं. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. ही चिंतेची बाब असून कोविड नियंत्रण उपयोजना सुरू आहे. राज्यात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहे. लॉकडाउन न करता कडक निर्बंध आणणार आहे. राज्य सरकार लवकरच नवीन नियामवली जाहीर करणार आहे' अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. Sachin Vaze प्रकरणी मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची होणार चौकशी? गर्दी नियंत्रित करण्यासाठी विविध उपाय योजनावर चर्चा सुरू आहे, कोविड संदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना दिल्यात. अमित शहा यांनी ही वाढत्या कोरोना केस संदर्भात सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार म्हणून आम्ही त्या सूचनांचे पालन करत आहोत, असंही टोपे म्हणाले. कॉन्टॅक्ट ट्रेंस करणे हे राज्य सरकार पुढे आव्हान आहे. कुठेही बेड कमी नाहीत. खाजगी ठिकाणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये अडचण असेल. राज्यात 85 टक्के ए सिमटोमॅटिक रुग्ण आहेत. रोज 3 लाख लसीकरणाचे लक्ष आहे. लसीकरणासाठी 100 बेड च्या रुग्णालयाची अट शिथिल करून 50 किंवा 25 करावी अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे, असंही टोपे यांनी सांगितले. जळगावात अखेर शिवसेनेनं करून दाखवलं, भाजप सत्तेतून बाहेर! 'माझ्या सर्व पक्षीय सहकाऱ्यांना आवाहन आहे की मंत्रालयात आणि शासकीय कार्यालयात भाऊगर्दी करू नये. अति महत्वाचं काम असेल तरच या, असं आवाहनही टोपे यांनी केलं.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Lockdown, Mumbai, Rajesh tope, राजेश टोपे

    पुढील बातम्या