महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी, कोरोनाबाधित रुग्णांबाबत नवीन आकेडवारी समोर

महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी, कोरोनाबाधित रुग्णांबाबत नवीन आकेडवारी समोर

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असली तरी मृत्यूदराचे प्रमाण कमी असल्याची बाबसमोर आली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 मे : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असली तरी मृत्यूदराचे प्रमाण कमी असल्याची बाबसमोर आली आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदर हे पश्चिम बंगाल, गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांपेक्षा कमी आहे.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना व्हायरसमुळे रुग्णांचा मृत्यूदर हा पश्चिम बंगाल (8.40), गुजरात (5.99) आणि मध्य प्रदेश (4.51) या राज्यांपेक्षा इतका आहे. जगात कोरोनाबाधितांचा मृत्यूदर 6.61 टक्के असताना महाराष्ट्रात मात्र तो 3.49 इतका आहे.  तर  देशातील मृत्यूदर 3.02 इतका आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडील माहितीचे संकलन करून सरकारने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचा -आईने काढली दृष्ट..., मुलाने केला कडक सॅल्युट! पोलिसाचं स्वागत पाहून डोळे पाणावले

शुक्रवारी राज्यात दिवसभरात 2 हजार 940 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. राज्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 44 हजार 582 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत राज्यात 12 हजार 583 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

तरुणांची संख्या जास्त

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. यात तरुणांची संख्या जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.  30 ते 40 या वयोगटात सर्वाधिक 8394 रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर  21 ते 30 या वयोगटात  8252 रुग्ण,  41 ते 50  वयोगटात 6952 आणि 51 ते 60 वयोगटात 6184 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. तर 61 ते 100 या वयोगटामध्ये 1571 रुग्ण आहेत. दहा वर्षांपर्यंतच्या 1413 मुलांनाही कोरोनाची लागण झाली  असून 2761 रुग्ण 11 ते 20 वयोगटातले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये पुरुषांची संख्याही 62तर महिलांची संख्या 38 टक्के इतकी आहे.

मुंबईसह पुण्यात सर्वाधिक रुग्ण

दरम्यान,  मुंबई, उपनगरं आणि पुण्यात गेल्या 24 तासांत जास्त प्रमाणात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात तब्बल 2,940 रुग्ण राज्यभरातून वाढले आहेत. त्यातली सर्वाधिक वाढ अर्थातच मुंबईत दिसून आली. राज्यभरात कोरोनाबळींच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 24 तासांत 63 मृत्यू नोंदले गेल्याने कोरोनाबळींची संख्या 1517 वर पोहोचली आहे.

राज्य सरकारने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या  आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णसंख्या 44582 वर पोहोचली आहे. दिवसभरातल्या 63 कोरोना मृत्यूंपैकी मुंबईत 27 आणि पुण्यात 9 मृत्यूंची नोंद झाली आहे.

हेही वाचा -18 वर्षांनंतर मुंबईहून गावी परतला, ना आई जिवंत होती ना बायको

मुंबईत रुग्णवाढीचे दररोज नवे उच्चांक समोर येत आहेत. आज एका दिवसातली सर्वाधिक रुग्णवाढ मुंबईत पुन्हा दिसून आली. 1751 रुग्ण गेल्या 24 तासांत मुंबईत आढळले. शहरात कोरोनाव्हायरसमुळे 27 मृत्यू नोंदले गेले.  मुंबईत कोरोनाव्हायरसचा धोका उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ठाण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असून ठाण्यात आज 186 नवे रुग्ण आढळून आले. ठाणे महापालिका हद्दीतली ही मोठी वाढ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 10:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading