मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'राज्यात कोरोनाची चौथी लाट', आदित्य ठाकरे यांचं विधान

'राज्यात कोरोनाची चौथी लाट', आदित्य ठाकरे यांचं विधान

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

राज्यात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

    मुंबई, 5 जून : राज्यात कोरोनाने (Maharashtra Corona) पुन्हा डोकंवर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांचा (Corona Patients) आकडा पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने केंद्र आणि राज्य सरकार तसेच प्रशासन सतर्क झालं आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याआधीच त्याला रोखता यावा यासाठी उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने ही कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) असल्याचं विधान राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ कमी झाली होती. मात्र आता गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 84 दिवसांनंतर शुक्रवारी पहिल्यांदाच देशातील नवीन कोविड रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली. तर, 4 फेब्रुवारीनंतर मुंबईत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वांत मोठी वाढ दिसून आली. शनिवारी देशात 3962 नवीन रुग्ण आणि 26 मृत्यूची नोंद झाली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील वाढत आहे. त्यामुळे देश कोरोनाच्या चौथ्या लाटेकडे वाटचाल करत आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. या दरम्यान आदित्या ठाकरेंनी ही कोरोनाची चौथी लाटच असल्याचं म्हटलं आहे. (अपक्ष महाविकास आघाडीसोबतच? सतेज पाटलांचा दावा, मुंबईत सर्व आमदारांची मॅरेथॉन बैठक आयोजित) 'घाबरायचं कारण नाही' आदित्य ठाकरे यांना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी सध्याच्या परिस्थिताला कोरोनाची चौथी लाटच म्हणूयात, असं म्हटलं. पण त्यापुढे ते महत्वाचं म्हणाले. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी घाबरायचं कारण नाही. सूचनांचे पालन करा. रुग्ण वाढत आहेत. सध्या चिंताजनक परिस्थिती नाही. मात्र मास्क लावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. राज्यात दिवसाला 1357 रुग्ण राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता वाढताना दिसत आहे. राज्यात काल दिवसभरात तब्बल 1357 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत काल दिवसभरात 889 नवे रुग्ण आढलले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा असाच वाढत राहिला तर पुन्हा निर्बंध लादण्याची नामुष्की सरकारवर ओढवू शकते, अशी भीती अनेकांकडून वर्तवण्यात येत आहे. पण सरकार सध्या तरी wait and watch या भूमिकेत आहे. राज्य सरकार सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहे. केंद्र सरकारचं पाच राज्यांना पत्र कोरोना प्रकरणांमध्ये झालेली वाढ पाहता, केंद्र सरकारने 5 राज्यांना पत्र लिहून रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यास आणि कडक उपाययोजना राबविण्यास सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. या पत्रात म्हटलं आहे की, राज्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थानिक संसर्ग वाढण्याची शक्यता वाढते. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पण 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 15,708 नवीन प्रकरणं नोंदवली गेली असून, 3 जून रोजी आठवड्यातील रुग्णसंख्या 21,055 झाली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 0.52 टक्के होता तो जूनच्या पहिल्या आठवड्यात 0.73 टक्के झाला आहे. एक्सपर्ट्स काय म्हणतात? केवळ भारतातच नाही तर जगभरातील कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी ओमिक्रॉन व्हेरियंट (Omicron Variant) जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय. देशात Omicron चा सब व्हेरियंट BA.4 आणि BA.5 आढळल्यानंतर सरकार आणि एजन्सींनी त्याची दखल घेतली. दरम्यान, भारतातील बहुतांश लोकसंख्येचं लसीकरण झाल्याने घाबरून जाण्याची गरज नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. प्रसिद्ध व्हायरॉलॉजिस्ट डॉ. शाहीद जमील यांनी या संदर्भात इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘आपल्याला नक्कीच सावध राहावं लागेल. जर एखादी व्यक्ती विषाणूच्या संपर्कात आली तर तिला संसर्ग होऊ शकतो. परंतु, स्थिती गंभीर होण्याची शक्यता कमी आहे. याचे मुख्य कारण म्हणजे देशातील बहुतांश लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलीये किंवा त्यांचं लसीकरण (Vaccination) झालंय. त्यामुळे त्यांच्यामध्ये इम्युनिटी (Immunity) तयार झाली आहे.’ ‘शरीरातील अँटीबॉडीजची पातळी कालांतराने कमी होत असली तरी टी सेल्स व्हायरसपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत राहतील आणि मानवी शरीराराला सुरक्षा देत राहतील, त्यामुळे जास्त काळजी करण्याचं कारण नाही,’ असे ICMRचे तज्ज्ञ डॉ. संजय पुजारी यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या