आपसात भांडण्यापेक्षा लोकांची कामं करा, काँग्रेस हायकमांडचा राज्यातल्या नेत्यांना सज्जड दम

आपसात भांडण्यापेक्षा लोकांची कामं करा, काँग्रेस हायकमांडचा राज्यातल्या नेत्यांना सज्जड दम

'काँग्रेसच्या विचारधारेचा अजेंडा महाराष्ट्रमध्ये राज्य चालवताना आग्रहाने मांडा अन्यथा दिल्ली हायकमांड नाराजीचा सूर लावेल.'

  • Share this:

मुंबई 23 जानेवारी : काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक झाली या बैठकीत दिल्लीतून आलेले मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांना काँग्रेसच्या विचारधारेचा अजेंडा महाराष्ट्रमध्ये राज्य चालवताना आग्रहाने मांडा अन्यथा दिल्ली हायकमांड नाराजीचा सूर लावेल असा सज्जड दम सर्व नेत्यांना दिला. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या हक्काचे मतदार असलेले दलित, आदिवासी, अल्पसंख्यक समाजाचे प्रश्न असे मुद्दे आणि विषय प्रमुख्याने  हाताळा त्याचं श्रेय कसे मिळेल हे आवर्जून पहा असही सांगण्यात आले. काँग्रेस वर्किंग कमिटीने जो अजेंडा संपूर्ण देशाला अंमलबजावणीसाठी दिला आहेत तो राज्यात कसा अवलंबीला जाईल याबाबत आग्रही रहा सल्लाही खरगे यांनी दिला.

पुढील काळात नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध करण्याबाबत देखील समन्वय समितीत भूमिका मांडा असेही नेत्यांना सांगण्यात आल्याचे समजते. राज्यातील नेत्यांनी पक्षविरोधी पक्षांतर्गत कोणतेही विधान करू नये, पक्षाला त्याचा फटका बसणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा कानपिचक्या देखील काँग्रेसच्या नेत्यांना खरगे यांनी दिल्याचे समजते.

भाजपने केले उद्धव ठाकरे, पवार आणि राऊतांचे फोन टॅप? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

मुंबईत टिळक भवन येथे काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारीणी तसेच नवनियुक्त मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लीकर्जून खरगे, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, यासह अनेक नेते उपस्थित होते.

मनसेच्या भगवीकरणामागे शरद पवारांचं डोकं, भाजप नेत्याचा आरोप

पुढील काळात काँग्रेस प्रदेशच्या वतीने गाव तिथे काँग्रेस हा झेंडा हाती घेतला जाणार असून त्यासाठी राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि प्रदेश पातळीवरील प्रमुख नेत्यांनी अधिक लक्ष द्यावे अशा सूचना या बैठकीत करण्यात आल्यात. पालकमंत्री म्हणून जी जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे त्यासोबतच अन्य दोन जिल्हे पक्षाच्या वाढीसाठी कार्य करायचे आदेश देखील या बैठकीत मंत्र्यांना देण्यात आलेत. काँग्रेसचे मतदार असलेले समाज यासाठी काँग्रेस कार्यरत आहे यावर अजून सांगावं आणि त्याचा अधिक प्रचार करावा असं सूचना देखील या बैठकीत देण्यात आल्या.

First Published: Jan 23, 2020 05:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading