'मोदी सरकारची कृषी विधेयकं शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारी', काँग्रेसचा हल्लाबोल

'मोदी सरकारची कृषी विधेयकं शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारी', काँग्रेसचा हल्लाबोल

महाराष्ट्रात ही विधेयकं लागू होऊ देणार नाहीत असं काँग्रेसने या आधीच जाहीर केलं आहे.

  • Share this:

मुंबई 28 सप्टेंबर: मोदी सरकाने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत त्यांना निवेदन दिलं. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

चव्हाण म्हणाले, ही विधेयकं ही काळी विधेयक आहेत. शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारी विधेयकं आहेत. शेतकऱ्यांना किमान हमी भाव हा कायदेशीर मिळाला पाहिजे. मोदी सरकारने फक्त घोषणाबाजी केली आहे.

कृषी विधेयकं ही घाईगर्दीत मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यावरून आम्ही राज्यपालांना निवेदन दिलेलं आहे. ही विधेयकं रद्द करावं अशी विनंती आम्ही राज्यपालांना केली आहे. राष्ट्रपतींनी मंजूरी दिली असली तरी संसद कायद्यला

स्थगिती देऊ शकते. ज्या राज्यात काँग्रेसची सरकार आहे तिथे निर्णय होईल, तात्पुरती स्थगिती मार्ग आहे असंही त्यांनी सांगितलं.

याच विषयावर राज्यपालांशी चर्चा केली, यात बसून मार्ग काढतां येईल असं राज्यपालांनी आम्हाला सांगितले असंही चव्हाण म्हणाले.

महाराष्ट्रात ही विधेयकं लागू होऊ देणार नाहीत असं काँग्रेसने या आधीच जाहीर केलं आहे.

महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मंत्री बाळासाहेब थोरात हे या शिष्टमंडळात सहभागी होऊ शकले नाहीत अशी माहितीही चव्हाण यांनी दिली.

Published by: Ajay Kautikwar
First published: September 28, 2020, 7:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading