कोरोनाविरोधातील लढ्याच्या निर्णायक टप्प्यात, शिस्त मोडू नका; आपण जिंकणारच- मुख्यमंत्री
कोरोनाविरोधातील लढ्याच्या निर्णायक टप्प्यात, शिस्त मोडू नका; आपण जिंकणारच- मुख्यमंत्री
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला.
मुंबई, 31 मार्च: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आपण सगळे कोरोनाच्या विरोधात लढत आहोत. हा टप्पा आता शेवटच्या आणि निर्णायक पातळीपर्यंत पोहोचला आहे. परंतु घाबरू नका, या करोनाविरुद्धच्या लढ्यात आपण जिंकणारच, असा आत्मविश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा..NRI झाला बेघर, मुंबईतील मजूर आणि भिकाऱ्यांच्या रिलीफ कॅम्पमधून घेतोय मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, नागरिकांनी संयम पाळवा. शिस्त मोडू नये. कोरोनाची लक्षणे आढळल्यास घाबरुन जाऊ नये. शासकीय रुग्णालयात जाऊन तपालणी करुन घ्यावी. परराज्यातील कामगार, मजुरांनी स्थलांतर करु नये, असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे. सर्दी-खोकला जाणवत असल्यास काळजी घ्या, घाबरुन जाऊ नका, शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
वेतन कपात नाही. दोन टप्प्यात विभागणी..
कोरोना विषाणुमुळे राज्य नाही, देश नाही तर संपूर्ण जग हादरलं आहे. कोरोनानंतर आपल्यावर आर्थिक संकट येणार आहे. आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यासाठी आपण नवी मांडणी केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात येणार नाही. कर्माचाऱ्यांना दोन टप्पात वेतन दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. आर्थिक घडी मोडू नये, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेहा वाचा..Coronavirus ची दहशत! कुठल्या देशात किती? पाहा हे आकडे
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे...
- परदेशातून परतलेल्यांनी माहिती लपवू नये. त्यांनी स्वत: जाऊन तपासणी करुन घ्यावी.
- अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्यांचे आभार
- कोरोनाचे लक्षणे आढळून आल्यास शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी करा
- परराज्यातील कामगार, मजुरांनी स्थलांतर करू नये
-एसीचा वापर कमी करा. .
-थंड पाणी, थंड सरबत अजिबात सेवन करु नये, ही काळजी घ्या... गरम पेय प्या.
-खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद केले आहेत. ते कृपया त्यांनी सुरू करावीत.
-मजुरांसाठी 1000 केंद्र सुरू केली आहेत. तिथे राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- प्रत्येक राज्यांने त्यांच्या राज्यातील मजूरांची काळजी घेतली आहे.
- रेशन संदर्भात केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारही वाटप करेल. त्याचे वितरण सुरू आहे.
- थोडी गैरसोय होतेय त्या बद्दल दिवगीर आहे.
-अन्नधान्यचा साठा मुबलक आहे.
- शिस्त पूर्णपणे आलेली दिसली पाहिजे. कुठेही झु़ंबड करू नका. काही ठिकाणी चौकोण आखलेले आहेत.
-रुग्णांची चाचणी करण्याची क्षमता वाढवली आहे.
- शिवभोजन थाळी ही 10 रुपयांवरुन 5 रुपयांवर आणली.
-सध्या 25 हजार थाळ्या, एक लाखापर्यंतची परवागनी दिली
- आपल्याकडे अन्न-धान्याचा पुरेसा साठा, कुणीही घाबरु नये
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.