Home /News /mumbai /

‘नाइट लाइफ’ म्हणजे फक्त मौजमजा, छंद-फंद नाहीत - उद्धव ठाकरे

‘नाइट लाइफ’ म्हणजे फक्त मौजमजा, छंद-फंद नाहीत - उद्धव ठाकरे

Mumbai: Shiv Sena president Uddhav Thackeray addresses media persons after a meeting with Congress leaders at BKC Trident, Bandra in Mumbai, Nov. 13, 2019. (PTI Photo)(PTI11_13_2019_000122B)

Mumbai: Shiv Sena president Uddhav Thackeray addresses media persons after a meeting with Congress leaders at BKC Trident, Bandra in Mumbai, Nov. 13, 2019. (PTI Photo)(PTI11_13_2019_000122B)

जे दिवसा चालतं तेच मुंबईत रात्री चालतं. मुंबई हे न झोपणारं शहर आहे… झोपत नाही तर मग रात्री करतं काय नेमकं? तर कष्ट करत असतं.

  मुंबई 04 फेब्रुवारी : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या 'मुंबई 24 तास' या योजनेला सुरुवात झालीय. त्यावरून भाजपने या योजनेवर सडकून टीका केलीय. या योजनेच्या नावाखाली चंगळवाद येणार असल्याची टीका भाजपने केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत या सगळ्यांचा समाचार घेतलाय. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग आहे. त्यात त्यांनी राज्याचा विकास, केंद्र-राज्य संबंध, नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट अशा सगळ्या विषयांवर आपली मतं व्यक्त केली. जे तुमच्या मनात आहे ते ‘नाइट लाइफ’मध्ये नाही असा टोलाही त्यांनी लगावला. उद्धव ठाकरे म्हणाले, जे तुमच्या मनात आहे ते त्या नाइट लाइफमध्ये नाही असं अत्रेंच्या शैलीत म्हणता येऊ शकतं. नाइट लाइफचा अर्थ असा की, ‘लाइफ’ हा शब्द महत्त्वाचा आहे त्यात. जीवन… जे दिवसा चालतं तेच मुंबईत रात्री चालतं. मुंबई हे न झोपणारं शहर आहे… झोपत नाही तर मग रात्री करतं काय नेमकं? तर कष्ट करत असतं. मग त्या कष्टकऱयांना जर आपण त्यांच्या हक्काचं म्हणण्यापेक्षा त्यांना आवश्यक असलेले जेवण या गोष्टी, इतर काही सोयी असतील त्या उपलब्ध करून द्यायच्या की नाही द्यायच्या? मुंबईकर हा दिवसासुद्धा कष्ट करतो. तो थकूनभागून उशिरा संध्याकाळी घरी जातो. घरी जाऊन थोडासा विसावून बाहेर पडतो. 'शेलार मामां'ची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली कोंडी; एकच वक्तव्य पडलं महाग तोपर्यंत सगळं बंद झालेलं असतं. तर नाइट लाइफचा अर्थ मौजमजा, छंद किंवा पब आणि बार नाहीये. तर कुटुंबासमवेत दिवसभरात तिकडे जाणे होत नाही. कुठे रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो म्हणा किंवा आणखी काही. या सगळय़ा गोष्टी नाइट लाइफ आहेत. म्हणजेच मुंबई ‘ट्वेंटी फोर बाय सेव्हन.’ विरोधी पक्षाचा हा गैरसमज आहे की, पोलीस रात्री झोपतात. विरोधी पक्ष जरी झोपत असले तरी आपला पोलीस. खरोखर त्याला मुजराच केला पाहिजे. तो चोवीस तास जागा असतो. असं काही नाही की, आपण झोपलो की पोलीस झोपतो. पोलीस जागतात म्हणूनच आपण झोपतो. हा फरक आहे हे लक्षात घ्या. तर आपण झोपलो म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त गेला आणि पोलीस घरी जाऊन झोपले असे नाही होत. 'हिंदू स्त्रियांनी आंबेडकरांच्या पायांची पूजा करावी'- विक्रम गोखलेंचं वक्तव्य आदित्यने विचारांती हा निर्णय केलेले आहे. याच्यामध्ये रात्रीचासुद्धा उपयोग जो आहे तो चांगल्या कामासाठी होत असेल… ऑफिसमध्येही रात्रपाळी असते हे लक्षात घेतलं पाहिजे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Mumbai night life

  पुढील बातम्या