पंतप्रधान मोदींच्या 'ड्रिम प्रोजेक्ट'ला उद्धव ठाकरेंचा विरोध

पंतप्रधान मोदींच्या 'ड्रिम प्रोजेक्ट'ला उद्धव ठाकरेंचा विरोध

'नुसतं आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा.. किंवा कमी दराने कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या हे होणार नाही.'

  • Share this:

मुंबई 04 फेब्रुवारी : राज्य चालविताना विकासाची क्रमवारी लावणं गरजेचं आहे. आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे. आताच्या आता काय ताबडतोबीने गरजेचे आहे. नुसतं आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा.. किंवा कमी दराने कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या हे चालणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या बुलेट ट्रेनला विरोध केलाय. 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग आहे. त्यात त्यांनी राज्याचा विकास, केंद्र-राज्य संबंध, नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट अशा सगळ्या विषयांवर आपली मतं व्यक्त केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, बुलेट ट्रेनबद्दलसुद्धा मला असं वाटतं. याच्यावरती सगळय़ांच्या सोबत बसून विचार व्हायला पाहिजे. बुलेट ट्रेनचा उपयोग कोणाला होणार आहे, त्याच्यामुळे इथे किती उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे आणि तो जर उपयोगाचा असेल… तर पटवून द्या. आपण जनतेसमोर जाऊ. मग पाहू काय करायचे ते. हे ड्रीम प्रोजेक्ट जरी असलं तरी जेव्हा जाग येते तेव्हा वस्तुस्थिती समोर असते… स्वप्न नसतं.

सोनिया गांधींची प्रकृती अद्याप अस्थिर, 'या' संसर्गामुळे होतोय त्रास

सरकारचं काम विकास करणं आहे. बरोबर आहे…अलीकडेच मी मंत्रालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर मेट्रोच्या दुसऱया टप्प्याचं उद्घाटन केलं. कामे सुरू आहेत हेही खरं आहे की. काही प्रकल्पांना मी स्थगिती दिली आहे… जरूर दिली आहे. मला नेहमी असं वाटतं की, पैशाचा जो मघाशी विषय निघाला त्या आर्थिक परिस्थितीकडे बघून राज्याच्या विकासाची प्राथमिकता ठरवली पाहिजे.

आताच्या आता काय ताबडतोबीने गरजेचे आहे. नुसतं आपल्याला कोण बिनव्याजी म्हणा.. किंवा कमी दराने कर्ज देतोय म्हणून ते अंगावरती घ्यायचं आणि गरज नसताना शेतकऱ्यांच्या जमिनी पण काढायच्या… पुन्हा हे जे पांढरे हत्ती आहेत ते पोसायचे, हे काही योग्य नाही.

'हर हर मोदी'ला, 'घर घर केजरीवालचं' उत्तर! देशाच्या राजकारणात पहिलाच प्रयोग!

'उद्योग राज्याबाहेर जाणार नाहीत'

त्याकरिता गेल्या आठवडय़ामध्ये मी काही उद्योगपतींना बोलावलं होतं. हे उद्योगपती किंवा उद्योग हे एक आपलं वैभव आहे असं मी म्हणेन… नक्कीच वैभव आहे, देशाचा औद्योगिक चेहरा म्हणून ज्यांना, ज्या व्यक्तिमत्त्वांना किंवा ज्या उद्योगांना किंवा ज्या उद्योगसमूहाला आपण नेहमी पाहतो, ते जवळपास सगळे किंवा जास्तीत जास्त हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि मुंबईतले आहेत. त्यांच्याशी मी बोलल्यानंतर एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, तसं त्यांच्याबरोबर आतापर्यंत इतक्या विश्वासानं कोणी बोललं नव्हतं.

VIDEO : दिल्लीच्या रोड शो मध्ये गृहमंत्री अमित शहांनी उंचावली तलवार

मधेमधे आपण पाहतो की, इतर राज्यांतले मुख्यमंत्री त्यांना इथे येऊन भेटून जातात. त्यांना अनेक प्रलोभने दाखवतात. आणि मग त्याचं पर्यवसान आपल्या राज्यातले उद्योगधंदे हे तिकडे जाण्यात होतं. मी या सर्व लोकांना विश्वास दिला आणि त्यांना सांगितलं की, मी एकही उद्योग माझ्या राज्याबाहेर जाऊ देणार नाही. ज्या काही अडीअडचणी तुमच्यासमोर आलेल्या आहेत… त्या तुम्ही मला सांगा…तुम्हाला मी या अडचणी सोडवून देतो, पण त्या सोडवल्यानंतर माझ्या राज्यातल्या जास्तीत जास्त भूमिपुत्रांना तुमच्या उद्योगधंद्यामध्ये रोजगार मिळालाच पाहिजे. हा माझा आग्रह असेल.आता कदाचित उद्या असं होईल की, एखाद्या उद्योगधंद्याला मी, सरकार म्हणून आम्ही काही मदत केली तर आरोप होतील. होऊ देत. मला नाही पर्वा. कारण मी माझ्या राज्याला बांधील आहे. इथल्या जनतेला बांधील आहे. विरोधकांना नाही.

गरज पडली तर महाराष्ट्रासाठी कॅमेरा काढणार

पर्यटनाबद्दल मी स्वतः असं ठरवलेलं आहे, आपण नेहमी असं बघतो की, सरकार एखाद्या प्रतिभावान, प्रथितयश व्यक्तीला ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर नेमतं आणि ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर नेमल्यानंतर पुढे त्यांनी काय करायचं हे त्याला काहीच सांगितलं जात नाही. त्याच्यामुळे तो तेवढय़ापुरता खूश असतो किंवा महिला असेल तर खूश असते. त्यानंतर काहीच केलं जात नाही. तर यावेळेला मी असं ठरवलंय की, ब्रॅण्ड ऍम्बॅसिडर वगैरे नेमण्याच्या ऐवजी काही जी आपली पर्यटनस्थळे आहेत, मग काही जंगलं असतील, काही लेण्या असतील, काही तीर्थक्षेत्रं असतील तिकडे मी स्वतः जायचं.

'भारत द्वेषाच्या राजकारणावर चालणार नाही',दिल्लीच्या पहिल्या सभेत मोदींचं वक्तव्य

मी स्वतः जाणार… फोटोग्राफी तर माझा छंद आहे. कदाचित माझ्यासोबत मी कॅमेरा ठेवेनही. पण हा छंद काही वाईट नाहीये आणि मी तो सोडणार नाहीये. माझी कला मी काही सोडत नाही, पण माझ्यासोबत विविध क्षेत्रांतले जे नामवंत आहेत, मग ते कोणी खेळाडू असतील, कोणी सिने कलाकार असतील, कोणी कदाचित राजदूत असतील… त्यांना घेऊन जायचं. मग तिथे गेल्यानंतर मला मुख्यमंत्री म्हणून पाहता येईल की, तिकडे सोयी किती आहेत आणि गैरसोयी किती आहेत. पण ते बघितल्यानंतर तिथे काय सुधारणा करायच्या आहेत त्या करू. सगळे सोबत आल्यानंतर ज्याला आपण टुरिस्ट मॅप म्हणू… जे आपलं महाराष्ट्राचं लेणं आहे, जे निसर्गनिर्मित असेल, मानवनिर्मित असेल हे जागतिक नकाशावर आणायचंय.

First published: February 4, 2020, 9:36 AM IST

ताज्या बातम्या