राजकारण हे 'कबड्डी'सारखं, पाय खेचण्यात यशस्वी तो मुख्यमंत्री, उद्योगपतींच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

राजकारण हे 'कबड्डी'सारखं, पाय खेचण्यात यशस्वी तो मुख्यमंत्री, उद्योगपतींच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

उद्योगांना येणाऱ्या सर्व अडचणी व समस्या दूर करणार, राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्योगपतींना दिली.

  • Share this:

मुंबई 07 जानेवारी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्योग क्षेत्रातील प्रमुखांशी संवाद साधला. मुंबईतल्या सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सर्व उद्योगपतींचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. राज्याला औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या अग्रेसर करण्यासाठी उद्योग क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने हा संवाद महत्त्वाचा मानला जातोय. राज्यशासन आणि CIIच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास मान्यवर उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत फटकेबाजी केली अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेले उद्योगपती हर्ष गोयंका यांनी दिली ट्विटरवरून दिलीय. पर्यटनंत्री आदित्य ठाकरे यांचंही त्यांनी कौतुक केलं.

उद्योगांना येणाऱ्या सर्व अडचणी व समस्या दूर करणार, राज्यातून एकही उद्योग बाहेर जाऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्योगपतींना दिली. या बैठकीला उपस्थित असलेले उद्योगपती आनंद महिंद्र यांना मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही 'कार' बनवता तर आम्ही 'सरकार'. राजकारण हे कबड्डी सारखं आहे. जो विरोधकांचे पाय खेचण्यात यशस्वी होते तोच मुख्यमंत्री बनतो.

उद्धव ठाकरेंच्या या खास शैली आणि फटकेबाजीने बैठकीतलं वातावरण हलकं झालं.

बैठकीला रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी, उद्योगपती रतन टाटा, उदय कोटक, आनंद महिंद्र, आदी गोदरेज, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, राजेश शाह, आनंद पिरामल, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, वरुण बेरी, महेंद्र तुराखिया, रवी रहेजा, बाबा कल्याणी, गोपिचंद हिंदुजा, सज्जन जिंदाल, गौतम सिंघानिया आदी मान्यवरांची उपस्थिती होती तर सरकारकडून उद्योगमंत्री सुभाष देसाई, अनिल परब आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकेर उपस्थित होते.

Published by: Ajay Kautikwar
First published: January 7, 2020, 10:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading