CM उद्धव ठाकरेंचा सत्ता स्थापनेवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

CM उद्धव ठाकरेंचा सत्ता स्थापनेवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

शिवसेना काँग्रेससोबत कशी गेली हे आश्चर्यजनक आहे असं फडणवीस म्हणाले होते. त्यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केल्याने राजकीय युद्ध रंगण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई 10 डिसेंबर : महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्याला आता महिना उलटून गेला तरी त्याचे पडसाद अजुनही उमटत आहेत. भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन केली. या प्रयोगाची देशभर चर्चा झाली. महाराष्ट्रात नवं सरकार येवून आता 13 दिवस झाले असले तरी सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागे काय झाले याचे अनेक खुलासे होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुलाखती देत अनेक गोष्टी सांगितल्या. जेवढ्या गोष्टी गरजेच्या आहेत तेवढ्याच आत्ता सांगणार आहे. काही गोष्टी उजेडात आलेल्या नाहीत. त्या योग्य वेळी बाहेर आणणार आहे असंही फडणवीसांनी सांगितलं होतं. त्यावरून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. शिवसेना काँग्रेससोबत कशी गेली हे आश्चर्यजनक आहे असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ते माजी मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याकडे माझी बरीच माहिती असेल. त्यांना काय बोलायचं आहे ते बोलू द्या.

एकनाथ खडसेंना भेटणारच, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भाजपची चिंता वाढली

काय म्हणाले होते फडणवीस?

23 नोव्हेंबरच्या सकाळी अचानक महाराष्ट्राला राजकीय धक्का देणारी बातमी आली आणि कुणाच्याही गावी नसताना मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस आले. मी पुन्हा येईन असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हे दुसऱ्यांदा मिळालेलं पद अवघ्या तीन दिवस टिकवलं आणि अखेर राजीनामा दिला. पण अजित पवारांना बरोबर घेऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय एका रात्रीत कसा झाला, त्या रात्री नेमकं काय झालं त्याचा घटनाक्रम माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत उलगडला होता. त्यावरूनच पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती.

मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी कबुल केलं की, एका रात्रीत असे मोठे निर्णय होत नसतात. फडणवीस म्हणाले, "दोन दिवस आधी ही चर्चा झाली. काही फिलर्स जात होते. आमच्या नेतृत्वाच्या स्तरावर काही गोष्टी घडत होत्या. पण स्पष्ट चर्चा अशी झालेली नव्हती." शपथविधीच्या आधी 2 दिवस अजित पवारांबरोबर चर्चा झाली होती.

'भारताचा प्रवास 'मेक इन इंडिया' पासून 'रेप इन इंडिया'पर्यंत'

हे स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले, "22 तारखेला रात्री ज्या वेळी या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार आमच्याकडे आले, आणि काँग्रेस- राष्ट्रवादी- शिवसेना या तीन पक्षांचं सरकार चालू शकत नाही, असं वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं, त्या वेळी आम्ही सरकार स्थापनेची तयारी सुरू केली. राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांचं मतही तसंच आहे, असं अजित पवार म्हणाले. "आम्ही सगळे भाजपबरोबर यायला तयार आहोत. कारण स्थिर सरकार आवश्यक आहे, असं अजित पवार म्हणाले. त्यांनी आमदारांच्या सह्यांचं पत्रही आणलं होतं. माझं काही आमदारांशी बोलणंही करून दिलं." पण आमचा तो गमिनी कावा फसला.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 10, 2019, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading