मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये चर्चा, गृहमंत्र्यांनी दिलं मदतीचं आश्वासन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमित शहांमध्ये चर्चा, गृहमंत्र्यांनी दिलं मदतीचं आश्वासन

राज्याने संभाव्य काय खबरदारी घेतलेली आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना दिली.

  • Share this:

मुंबई 2 जून: महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ धडकण्याचा धोका असल्याने सोमवारी रात्री उशीरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर चर्चा केली. या संकटाच्या पार्श्वभूमीवर शहा यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं. 3 जूनच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळ हे कोकण किनारपट्टीसह मुंबईच्या किनाऱ्यावरही धडकण्याची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्याने संभाव्य काय खबरदारी घेतलेली आहे याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना दिली. राज्य सरकारने मुंबई, ठाणे, कोकण, पालघर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या भागात अलर्ट घोषीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. NDRFची पथकं किनारपट्टीच्या भागात तैनात करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले.

तर आणखी काही मदत लागल्यास ती देण्याची तयारी अमित शहा यांनी दाखवली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही ट्वीट करत सरकारने काय तयारी केली याची माहिती दिली आहे. ते म्हणाले,

 हे वाचा -मुंबईच्या या एका भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येने गाठला 3000 चा टप्पा

अरबी समुद्रात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन प्रशासन सजग आहे.

कोकण किनारपट्टीवर NDRF च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत, त्यांच्याकडून स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन पूर्वतयारी केली जात आहे. समुद्रात गेलेल्या सर्व बोटी बंदरात परत बोलावून घेतल्या आहेत.

 हे वाचा - महाराष्ट्र कोरोनाला हरवणारच! पहिल्यांदाच दिलासा देणारे 2 आकडे आले समोर

वादळाचा धोका असलेल्या भागातील जिल्हाधिकारी यांनी चक्रीवादळ पुर्वतयारी व उपाययोजनेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय यंत्रणेसोबत बैठका घेतल्या.

Video Conferencing द्वारा तालुका प्रशासनालाही योग्य सूचना दिल्या आहेत. किनारपट्टीवरील नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

First published: June 2, 2020, 7:11 AM IST

ताज्या बातम्या