मुंबई 26 सप्टेंबर: राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अजुनही वाढतच आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्य सरकार प्रयत्न करत आहे मात्र कोरोनाचा वेग कमी होतांना दिसत नाही. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रियाही सुरू आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही आणि अशीच गर्दी वाढत राहिले तर कोरोनाची दुसरी लाट येवू शकते अशी शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय. लोक आता कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत. गर्दी वाढत आहे आणि नियमांचं पालन ज्या काटेकोरपणे करायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही त्यामुळे कोरोनाचा वेग वाढण्याची भीती आहे. लोकांना कठोरपणे नियमांचं पालन करावं असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येते की काय अशी एकीकडे भीती असतानाचा आता जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO)ने आणखीन एक धक्कादायक दावा केला आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या आता 20 लाखांपर्यंत पोहोचू शकते असा दावा WHO कडून करण्यात आला आहे. कोरोनावर लस येण्याआधी आणि लस आल्यानंतरही जगभरात ही लस नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळा लागू शकतो. या कालावधीमध्ये कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही 20 लाखांपर्यंत पोहोचू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray expresses apprehensions of 'second wave' of #coronavirus transmission as more people are moving out for work, calls for stricter compliance with norms
— Press Trust of India (@PTI_News) September 26, 2020
कोरोनाचा वाढणारा हा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. नाहीतर याचे परिणाम येत्या काळात अत्यंत गंभीर होतील आणि मृत्यूचा आकडा वाढेल जे धोकादायक आहे असंही WHOनं म्हटलं आहे. जगभरात 3 कोटी 27 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनाची दुसरी लाट काही देशांमध्ये येत असल्यानं जागतिक पातळीवर या विषाणूसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Uddhav thackeray