Home /News /mumbai /

ST Employees Protest: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन

ST Employees Protest: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना फोन

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (फाईल फोटो- पीटीआय)

शरद पवार आणि उद्धव ठाकरे (फाईल फोटो- पीटीआय)

Maharashtra CM Uddhav Thackeray call to Sharad Pawar after ST employees protest: एसटी कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं. यावेळी दगडफेक आणि चप्पलफेकही झाली.

मुंबई, 8 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या मुंबईतील घराबाहेर दुपारच्या सुमारास मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी जमा झाले आणि त्यांनी आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी शरद पवारांच्या घरासमोर दगडफेक आणि चप्पलफेकही केल्याची दृश्य समोर आली (ST employees protest outside Sharad Pawar house in Mumbai) आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्यासंदर्भात चर्चा केली. तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या सुरक्षितते संदर्भातही चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घरावरा झालेल्या हल्याची गंभीर दखल घेतली आहे. त्या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी फोनवरून चर्चा केलीय. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत गृहविभाग आणि मुंबई पोलिसांना संपुर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. आंदोलनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया शरद पवार म्हणाले, मी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांना आधार देणं गरजेचं आहे. पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाहीये. एसटी कर्मचाऱ्यांचा मार्ग चुकत असेल तर त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. राजकारणात संघर्ष असतात पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाहीये. गेले काही दिवस हे जे काही आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न होत होता ते शोभनीय नव्हता. एसटी कर्मचारी आणि माझा घनिष्ठ संबंध आहे. गेल्या 50 वर्षांपासून हे नाते आहे. त्यांचं एकही अधिवेशन माझ्याकडून सुटलं नाही. संकट आलं तर आपण सर्व एकत्र आहोत हे तुम्ही दाखवून दिलं त्याबद्दल तुमचे आभार असंही शरद पवार कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. टोकाची भूमिका घेण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. नेता चुकीचा असेल तर त्याचे परिणाम काय होतात हे आज दिसलं असंही शरद पवार म्हणाले.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Sharad Pawar (Politician), St bus, Uddhav thackeray

पुढील बातम्या