उद्धव ठाकरे यांना 'चैत्यभूमी'वर जायला वेळ नाही, भाजपचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांना 'चैत्यभूमी'वर जायला वेळ नाही, भाजपचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

' 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यासंबधी तयारीच्या बैठकीला काँग्रेस-राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित नव्हते.'

  • Share this:

मुंबई 04 डिसेंबर : उद्धव ठाकेर सत्तेवर येवून काही दिवस होत नाहीत तोच भाजपने मुख्यमंत्र्यांना टार्गेट करायला सुरुवात केलीय. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे हे अनेक ठिकाणी गेले मात्र त्यांना चैत्यभूमीवर जायला वेळ नाही अशी बोचरी टीका भाजपचे नेते भाई गिरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केलीय. या टीकेमुळे दोन्ही पक्षांमधलं आरोपांचं युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. 80 तास मुख्यमंत्रिपदावर येऊन देवेंद्र फडणवीसांनी केंद्राला 40 हजार कोटी परत केले असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे भाजपने संधी साधत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

रश्मी ठाकरे करणार 'वर्षा'ची पाहणी, नव्या मुख्यमंत्र्यांसाठी बंगला होतोय तयार!

भाजपचे नेते गिरकर म्हणाले, 6 डिसेंबरला 64 वा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. यासंबधी तयारीच्या बैठकीचं मला निमंत्रण आलं होतं. बैठकीला गेलो तेव्हा फक्त सुभाष देसाई मंत्री म्हणून उपस्थित होते, म्हणजे मुख्यमंत्री आणि काँग्रेस आघाडीचे मंत्री उपस्थित नव्हते. ज्या दिवशी 15 लाख लोकं उपस्थित रहातात, अशा दिवसासंदर्भात महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री उपस्थित नव्हते.

बलात्काराच्या आरोपातील स्वयंघोषित बाबाने तयार केला देश; क्रिकेटपटू म्हणाला...

उलट देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते तेव्हा ते स्वतः तयारी संदर्भातली बैठक घ्यायचे. राज्यपाल सुद्धा फडणवीस यांच्याबरोबर सकाळी 8 वाजता अभिवादन करायला चैत्यभूमीवर उपस्थित असायचे.  मात्र सध्याचे मुख्यमंत्री यांना अजूनही चैत्यभूमीवर जायला वेळ मिळालेला नाही. देशातील अनेक केंद्रीय मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती हे सुद्धा चैत्यभूमीवर जाऊन आलेले आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 4, 2019, 4:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading