मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Maharashtra School: राज्यातील 'या' भागांत 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार; 'या' आहेत Guidelines

Maharashtra School: राज्यातील 'या' भागांत 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार; 'या' आहेत Guidelines

इयत्ता आठवी ते बारावी शाळा आणि ज्युनियर कॉलेज सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

इयत्ता आठवी ते बारावी शाळा आणि ज्युनियर कॉलेज सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

इयत्ता आठवी ते बारावी शाळा आणि ज्युनियर कॉलेज सुरू करण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

    मुंबई, 7 जुलै : ग्रामीण भागात (Rural area of Maharashtra) कोविडमुक्त ग्रामपंचायतीचा (Covid free grampanchayat) अंतर्गत असणारे इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू (Class 8 to Class 12) करण्याबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर एक समिती गठित केले आहे. त्याचे अध्यक्षपद ग्रामपंचायतीचे सरपंच असतील. त्यामध्ये तलाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी ग्रामसेवक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांची समिती याबाबत निर्णय घेईल.

    शाळा सुरू करण्यापूर्वी कमीत कमी एक महिना संबंधित गावात कोविड रुग्ण आढळला नसावा, शिक्षकांचे लसीकरण करण्यात आले असावे, जर ते केले नसेल तर पहिल्यांदा लसीकरण करावे विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी काढण्यासाठी शाळा परिसरात येऊन देऊ नये. विद्यार्थी बाधित झाल्याचे आढळल्यास तात्काळ शाळा बंद करावी आणि शाळा निर्जंतुकीकरण करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांनी घ्यावी विद्यार्थ्यांचे विलगीकरण करावे व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने उपचार सुरू करावेत.

    Coronavirus: पुण्यात कोरोनाची तिसरी लाट? रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ

    शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलावण्यात यावे. उदाहरणार्थ वर्गांना आदलाबदलीच्या दिवशी सकाळी दुपारी ठराविक महत्त्वाच्या विषयांसाठी प्राधान्याने तसेच सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, एका बाकावर एकच विद्यार्थी असावा, दोन भागांमध्ये सहा फुटाच्या अंतरावर असावे, एका वर्गात जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी असावेत, सतत साबणाने हात धुणे, मास्क वापर करणे, कोणतेही लक्षण आल्यास विद्यार्थ्यांना तात्काळ घरी पाठवणे. तसेच त्यांची चाचणी करून घेणे याकडे लक्ष राहावे संबंधित शाळेचे शिक्षकांना राहण्याची व्यवस्था त्याच भागांमध्ये करावी शिक्षकांना दररोज प्रवास करू नये त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर शक्यतो करण्याचे टाळावे.

    या सर्व गोष्टींवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे अधिकारी आरोग्य विभागाचे अधिकारी यांनी लक्ष ठेवावे. सातत्याने या संदर्भात आढावा घेणे गरजेचे आहे शाळा सुरू करण्यापूर्वी व शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य तसेच सुरक्षाविषयक उपाय योजनेची मार्गदर्शक सूचना अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मागील काही दिवसांपूर्वी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ते बारावी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता पण काही त्रुटी जात असल्याने तात्काळ संबंधित अध्यादेश रद्द करण्यात आला आता नव्याने अध्यादेश केला आहे.

    First published:
    top videos

      Tags: Coronavirus, Maharashtra, School