नाणार आंदोलकांवरचेही गुन्हे मागे, उद्धव ठाकरे यांचा आदेश

नाणार आंदोलकांवरचेही गुन्हे मागे, उद्धव ठाकरे यांचा आदेश

खटले मागे घेतल्याने गढ असलेल्या कोकणात शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे. तर प्रकल्पाच्या भवितव्यविषयी चिंता व्यक्त केली जातेय.

  • Share this:

मुंबई 02 डिसेंबर : आरे कारशेडला विरोध करताना आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेतले होते. त्यानंतर आता त्यांनी दुसरा मोठा निर्णय घेतलाय. नाणार रिफायनरी प्रकल्पा विरोधातल्या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात दाखल झालेले गुन्हे आता मागे घेण्यात येणार असल्यानं कोकणातल्या आंदोलकांना दिलासा मिळालाय. कोकणात हा प्रकल्प होऊ नये यासाठी शिवसेनेनेही आंदोलनात उडी घेतली होती. त्यानंतर हा प्रकल्प रायगडला हलविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. या प्रकल्पामुळे पर्यावरणाला हानी पोहोचू शकते असं वाटल्याने स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता.

त्यानंतर लोकसभा निवडणुकीत युती करताना शिवसेनेनं हा प्रकल्प रद्द करण्याची अटच भाजपला घातली होती. त्यामुळे कोकणातला हा प्रकल्प बारगळला होता. निवडणुकीच्या काळात त्यावरून राजकारणही तापलं होतं. आता सरकार बदलल्याने या प्रकल्पाविषयी या सरकारची काय भूमिका राहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खटले मागे घेतल्याने गढ असलेल्या कोकणात शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदींनीच ठेवला होता युतीचा प्रस्ताव, शरद पवारांनी केला मोठा खुलासा

आरे बाबतचे उद्धव ठाकरेंचे दोन मोठे निर्णय

आरे कारशेडच्या बांधकामाला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याच प्रकरणात आता दुसरा मोठा निर्णय घेतलाय. आरे कारशेडविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते सर्व गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी रविवारी केली. आरे कार शेड मधील झाडं तोडताना पर्यावरण कार्यकर्त्यांनी वृक्ष तोडीला विरोध करत आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून पर्यावरण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. हेच गुन्हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे पर्यावरण कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

पंकजा मुंडे भाजप सोडणार का? त्यांच्या विश्वासू आमदाराने केला मोठा खुलासा

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कार शेडच्या बांधकामाला स्थगिती दिली होती.  ते म्हणाले, मी दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यामुळे आरे कार शेडच्या कामाला स्थगिती दिलीय. त्याचा आढावा घेतल्याशीवाय पुढे जाणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही. मात्र अंधाधूंद कारभार चालणार नाही असंही त्यांनी सांगितलं. रातोरात झाडांची कत्तल झाली हे चालणार नाही. ते पुढे म्हणाले, मी अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रिपदावर आलोय. मी जबाबदारीपासून पळालो असतो तर शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून घ्यायला लायक ठरलो नसतो. ही जबाबदारी मोठी आहे कारण तीन पक्षांचं सरकार आहे. अजुनही मला मुख्यमंत्री झालो असं वाटतच नाही. अजुनही मी विधानसभा आणि विधान परिषद पाहिली नाही. टीका करताना अशी करा की त्याला त्याच्या चूका लक्षात आल्या पाहिजे. केवळ टीका करायची म्हणून टीका करू नका. पत्रकारांनी सरकारचे कान आणि डोळे व्हावे.

First published: December 2, 2019, 8:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading