'छत्रपती शिवराय, आई-वडिलांची शपथ घेणं गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन'

'छत्रपती शिवराय, आई-वडिलांची शपथ घेणं गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन'

देवेंद्र फडणवीस यांनी जागेवरच उभे राहून नियमांची पुस्तिका दाखवली.

  • Share this:

मुंबई,30 नोव्हेंबर:'सभागृहाने माझ्यावर विश्वास ठेवला, त्याबद्दल मी आभार मानतो. पण सर्वात आधी त्या जनतेचे आभार ज्यांच्यामुळे मी इथे आहे. छत्रपती शिवराय हे आमचं दैवत, त्यांना वंदन करुन मी सभागृहात प्रवेश करतोय. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, आई-वडिलांची शपथ घेणं हा गुन्हा असेल तर तो मी सातत्याने करेन, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने शनिवारी अखेर विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव अशोक चव्हाण यांनी मांडला. जयंत पाटील, नवाब मलिक आणि सुनील प्रभू यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले. त्यानंतर शिरगणती घेण्यात आली. त्यात विश्वासदर्शक ठरावांच्या बाजूने 169 मतदान झाले. तर भाजपने विश्वासदर्शक ठरावापूर्वीच सभात्याग केल्याने विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात शुन्य मतदान झाले. तर 4 आमदार तटस्थ राहिले. चार तटस्थ आमदारांमध्ये एमआयएमचे दोन, सीपीआय(एम) एक आणि मनसेच्या एका आमदारांचा समावेश आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी नियम पाळणारा माणूस आहे...

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया ही नियमबाह्य असल्याचा आरोप केला. फडणवीस यांनी सांगितले की, रात्री आम्हाला अधिवेशनात हजर होण्याचे आदेश दिले. आमचे सदस्य येऊ नये, असा भाजपचा आरोप केला. अधिवेशनाचा समन्स काढण्यात आली नाही. त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी गॅलरीत येऊन गोंधळ केला. यादरम्यान मी नियम पाळणारा माणूस आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हसून उपहासात्मक टाळ्या वाजवल्या. नंतर नही चलेगी.. दादागिरी नही चलेगी.. अशी घोषणाबाजी करत भाजपच्या आमदारांनी सभात्याग केला.

देवेंद्र फडणवीस यांनी जागेवरच उभे राहून नियमांची पुस्तिका दाखवली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार live टेलकास्ट केले जात आहे. संविधानावर बोलण्याचा मला अधिकार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले प्रश्न राज्यपाल कार्यालय संबंदी आहेत. त्यामुळे त्यांचा उहापोह सभागृहात होऊ शकत नाही, असे विधासभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

सभागृहात नेमकं काय घडलं?

-अशोक चव्हाणांनी विश्वासदर्शक ठराव मांडला

-सुनील प्रभू यांच्याकडून प्रस्तावला अनुमोदन

-जयंत पाटील आणि नवाब मलिक यांच्याकडून प्रस्तावला अनुमोदन

-भाजपच्या आमदारांची सभागृहात घोषणाबाजी

-भाजप आमदारांचा सभात्याग

-भाजपचा विश्वासदर्शक ठराव मतदानावर बहिष्कार

Published by: Sandip Parolekar
First published: November 30, 2019, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading