Home /News /mumbai /

परदेशी लसी मागवण्यात अनेक अडचणी, राज्य सरकारला खर्चाचीही चिंता; मंत्रिमंडळात होणार चर्चा

परदेशी लसी मागवण्यात अनेक अडचणी, राज्य सरकारला खर्चाचीही चिंता; मंत्रिमंडळात होणार चर्चा

Coronavirus Maharashtra: या बैठकीनंतर सरकार सर्वांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा करणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

मुंबई, 27 एप्रिल : राज्यात 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण (corona vaccination) करण्याचा राज्य सरकार प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी लसींचा साठा मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. इतर देशांतील लसी आणता येणार असल्या तरी त्यामध्येही काही अडचणी असल्याचं समोर येत आहे. त्यामुळं एकूणच लसीकरण, परदेशातून लसी मागवणे यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत (cabinet Meeting) चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र दिनांचं औचित्य साधत 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण सुरू करण्याची राज्य सरकारची इच्छा आहे. पण लस उपलब्ध झालीच नाही तर ते शक्य होणार नाही. आपल्याकडे देशात सध्या फक्त सिरम आणि भारत बायोटेक या दोन लसी उपलब्ध आहेत. इतर कंपन्यांच्या लसी येण्यास किमान 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. विशेष म्हणजे त्यासाठी खासगी परदेशी कंपन्या कायदेशीन नुकसान भरपाईचीदेखिल अट ठेवत आहेत. त्याचबरोबर परदेशातून आयात केलेल्या लसींचा साठा -70 अंश सेल्सिअस तापमानात ठेवावा लागेल. वाहतूक करताना हे कोल्ड स्टोरेज राखणं कठीण काम आहे. त्यामुळं देशांतर्गत उत्पादक कंपनीची लसच प्राधान्याने घेण्यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊ शकते. (वाचा-Oxygen तुटवडा असताना पिंपरीतील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचा अपव्यय) राज्यात 18-45 वयोगटातील साधारणपणे 5.71 कोटी नागरिक आहेत. प्रत्येत दोन डोस या प्रमाणे साधरण 12 कोटी डोस नागरिकांना लागतील. त्यासाठी जवळपास 6500 कोटींचा खर्च लागणार आहे. त्यामुळं राज्य शासन वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या, ग्रुप, एनजीओ यांना सीएसआर तसेच इतर निधीतून लोकांना लस उपलब्ध करून द्यावी यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मुंबई मनपा, सिडको, एमएमआरडीए यंत्रणा काही आर्थिक भार उचलण्याची शक्यता आहे. आर्थिक कमकुवत नगरपालिका, नगरपरिषद यांना लस उपलब्ध करून देण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच  लसीकरण मोहिमेसाठी नवीन स्वतंत्र खातं तयार करण्याचा विचार सुरू असून त्यावरचही चर्चा होऊ शकते. (वाचा-कोरोनाची भयंकर परिस्थिती पाहून कोरोना योद्धेही बिथरले! ढासळतंय मानसिक आरोग्य) परदेशातील खासगी इतर कंपन्यांच्या लसी भारतात यायला 2-3 महिने लागतील. शिवाय त्यामध्ये इतरही अडचणी आहेत. त्यामुळं देशांतर्गत लस उत्पादक कंपनीची लस प्राधान्याने घेण्याबाबत बैठकीत चर्चा होईल. या बैठकीनंतर सरकार सर्वांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा करणार का याकडंही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण परदेशी लस टोचून घ्यायची इच्छा असणाऱ्यांना मात्र वाट पाहावीच लागणार असं चित्र सध्या तरी आहे.
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona vaccination

पुढील बातम्या