शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी 100 कोटी, राज्य सरकारचा निर्णय

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी 100 कोटी, राज्य सरकारचा निर्णय

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींची तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी 100 कोटींची तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या स्मारकाच्या निर्मितीची जबाबदारी ‘एमएमआरडीए’कडे सोपवण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 23 जानेवारी रोजी म्हणजेच त्यांच्या जयंतीदिनी शिवाजी पार्क येथील महापौर निवासस्थानी गणेशपूजन होणार आहे. या समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलवण्यात येणार नसल्याचे सेनेतील सूत्रांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर स्मारकाची घोषणा झाली. पण त्यानंतर 5-6 वर्ष काहीच काम झाले नाही. आता शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यात आणि भूमिगत स्वरूपात हे स्मारक केले जाणार आहे.


VIDEO : 'कुण्या गावाचं आलं पाखरू...' हॉस्पिटलमध्येच परिचारिकांचा तुफान डान्स

Loading...बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 12:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...