मुद्रांकशुल्कवाढीवरुन युतीत ठिणगी, सेनेचा आंदोलनांचा इशारा

मुद्रांकशुल्कवाढीवरुन युतीत ठिणगी, सेनेचा आंदोलनांचा इशारा

राज्य सरकारनं वाढवलेला मुद्रांकशुल्क तातडीनं कमी करावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदमांनी दिलाय.

  • Share this:

17 मे : शिवसेना आणि भाजपमध्ये मुद्रांकशुल्कवाढीवरुन ठिणगी पडलीये. राज्य सरकारनं वाढवलेला मुद्रांकशुल्क तातडीनं कमी करावा अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदमांनी दिलाय. कॅबिनेटमध्ये मुद्रांकवाढीचा घेतलेला निर्णय शिवसेनेला विश्वासात न घेता घेतल्याचा आरोपही कदम यांनी केला.

शहरी भागातील स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेन्स डीड) 5 टक्के तर ग्रामीण भागासाठी 4 टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णय सरकारने घेतलाय. या निर्णयाला सेनेनं विरोध केलाय. तसंच बक्षीस पत्रासाठी तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही शिवसेनेचा विरोध केलाय.  काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही सेनेनं विरोध केला होता.  शिवसेनेच्या विरोधानंतरही निर्णय घेतल्याने शिवसेना मंत्री संतप्त झाले. मुख्यमंत्र्यांनी निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा कदम यांनी दिलाय. तसंच उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून निर्णय मागे घेण्यास सांगणार अन्यथा सत्तेत असलो तरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असं रामदास कदम यांनी ठणकावून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2017 07:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading