मुंबई, 15 जून: राज्यातील युती सरकारचा बहुप्रतिक्षित विस्तार उद्या होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार आहे याची संभाव्या यादी समोर आली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी राजभवनात तयारी करण्यात आली आहे. राजभवनाच्या गार्डनवर शपथविधी होणार असून यासाठी मंडप टाकण्याच्या काम सुरू आहे. 250-300 लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यासाठी तयारी सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने शपथविधी सोहळा यासाठी मंडप आणि आसन व्यवस्था काम सुरू केले. राजभवनाच्या दरबार हाॅलच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने गार्डनवर हा शपथविधी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत चर्चा रंगली आहे. पुढील आठवड्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा आहे. न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेल्या माहितीनुसार भाजपकडून राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, आशिष शेलार, अनिल बोंडे, बाळा भेगडे, परिणय फुके, अतुल सावे, संजय कुटे, योगेश सागर, अशोक उईके यांनी संधी मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयमधील अविनाश महातेकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
यांना मिळणार डच्चू
राजकुमार बडोले, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, प्रकाश मेहता, विद्या ठाकूर, विष्णु सावरा यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेकडून यांना संधी
राज्यमंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर आणि राजेश क्षीरसागर यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फडणवीस मोदी चर्चा
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या सात जागा रिक्त आहेत. त्याचे नेमके काय करायचे यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत तीन पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
SPECIAL REPORT : दोन राजेंची फाईट, वातावरण झाले टाईट; पवार कसा सोडवणार तंटा?