Home /News /mumbai /

मोठी बातमी! ठाणे जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रीपदे, प्रताप सरनाईक आणि बालाजी किणीकर यांचीही लॉटरी लागणार?

मोठी बातमी! ठाणे जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रीपदे, प्रताप सरनाईक आणि बालाजी किणीकर यांचीही लॉटरी लागणार?

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला जास्त मंत्रीपदे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबई, 7 जुलै : शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) हा दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे त्यातील पहिल्या टप्प्याचा विस्तार हा आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) आधी होणार आहे. याचाच अर्थ येत्या 10 जुलैच्या आधी शिंदे सरकारच्या (Shinde Government) पहिल्या टप्प्प्याच्या विस्तारातील 8 ते 10 मंत्र्यांचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. विशेष म्हणजे मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दरम्यान आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला जास्त मंत्रीपदे मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला जास्त मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यंत्री, कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. विशेष म्हणजे म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पालकमंत्रीपद भूषवणारे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांना यावेळी कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तर शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक आणि बालाजी किणीकर यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय महामंडळात देखील ठाणे जिल्ह्यातील अनेक आमदारांची वर्णी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक आठवडा झाला आहे, पण अजूनही इतर मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आषाढी एकादशीआधीच होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी आषाढी एकादशी असल्यामुळे एकनाथ शिंदे पंढरपूरला शासकीय पुजेसाठी जाणार आहेत, त्याआधी म्हणजे शुक्रवार किंवा शनिवारी नवे मंत्री शपथ घेतील. (मंत्रालयासमोरचा तो बोर्ड एका आठवड्यानंतरही रिकामा, सुप्रिया सुळेंनी Photo दाखवला!) पहिल्या टप्प्यामध्ये 8 ते 10 मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं. आमदारांच्या या बंडामुळे राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या