मुंबई 09 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारात त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही बैठक रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होती. यात मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात विस्ताराने चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे (Maharashtra cabinet expansion). यात शिंदे गटाने ८ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदांची मागणी केल्याचं समोर येत आहे.
शिंदे-फडणवीस अमित शाहंच्या भेटीला, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर शिक्कामोर्तब!
मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या एकूण ४३ मंत्र्यांपैकी शिंदे गटाने ८ कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रिपदांची मागणी केली असून उर्वरीत २९ मंत्रिपदे भाजपने घ्यावीत, असा प्रस्ताव आहे. एकनाथ शिंदे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. जे पी नड्डा तसंच मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचीही ते भेट घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ते खास विमानाने पुण्याला परतणार आहेत.
फडणवीस-शिंदेंचा दिल्ली दौरा -
दिल्लीमध्ये विमानतळावर उतरल्यानंतर शिंदे आणि फडणवीस हे दोघं थेट अमित शाह यांच्या भेटीला जाण्याची शक्यता होती. मात्र शाहांकडे न जाता दोघेही महाराष्ट्र सदनात आले. त्यानंतर काही वेळाने फडणवीस एकटेच सदनामधून रवाना झाले. शिंदे मात्र नव्या महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांच्या विशेष कक्षातच होते. शिंदे यांना न घेताच फडणवीस सदनामधून बाहेर पडल्यामुळे शाहांची भेट थोडी लांबणीवर पडली होती. मात्र रात्री 9.30 वाजता अमित शाह यांच्या निवासस्थानी सुरू झालेली बैठक रात्री उशिरा 2.30 वाजता संपली.
'ओबीसी आरक्षणासाठी खंबीर पावलं उचला', पंकजा मुंडेंच्या शिंदे-फडणवीसांना सूचना
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला निश्चित झाला असला तरी नव्या मंत्र्यांच्या शपथविधीसाठी सोमवार उजाडण्याची शक्यता आहे. कारण उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन मुख्यमंत्री दिल्लीहून पुण्याला जाणार आहेत. पुण्यावरूनच एकनाथ शिंदे रविवारी पहाटे पंढरपूरला जातील. तिकडे मुख्यमंत्री आषाढी एकादशीनिमित्त शासकीय पूजा करतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Devendra Fadnavis, Eknath Shinde