महाआघाडीच्या सरकारमधील 'सोयरीक'; घराणेशाहीतील वारसदारांना मिळाले मंत्रिपद

महाआघाडीच्या सरकारमधील 'सोयरीक'; घराणेशाहीतील वारसदारांना मिळाले मंत्रिपद

या सत्तेत सामान्य आमदारांना मंत्रिपद देण्याऐवजी सत्तेतील सोयरे सकळ, खूश राहतील याची काळजी घेण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई,30 डिसेंबर: महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात घराणेशाहीचा वरचष्मा पाहायला मिळाला. तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र, या सत्तेत सामान्य आमदारांना मंत्रिपद देण्याऐवजी सत्तेतील सोयरे सकळ, खूश राहतील याची काळजी घेण्यात आली आहे. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सोयऱ्यांचा गोतावळा पाहायला मिळत आहे. 'सत्तेतील सोयरे सकळ', या उक्तीची सार्थ प्रचिती मंत्रिमंडळाच्या विस्तारात पाहायला मिळाली आहे. पिता-पुत्र एकाच मंत्रिमंडळात असल्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात कदाचित पहिल्यांदा पाहायला मिळाले आहे. ठाकरे पितापुत्राने एकत्रितपणे संसदीय राजकारणात पदार्पण केले आहे.

> पहिल्यांदाचा निवडून आल्यानंतर विधानसभेत पाऊल ठेवणाऱ्या आदित्य ठाकरे यांची शिवसेनेने थेट कॅबिनेटमंत्रिपदी वर्णी लावली आहे. मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे ही ठाकरेशाही सत्तेत चांगलीच रमली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घराणेशाहीवर नेहमीच टीका केली. मात्र, प्रिन्स सूटमधल्या आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतल्या घराणेशाहीवर शिक्कामोर्तब केल्याचे आजच्या शपथविधी सोहळ्यात दिसून आले.

> माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव लातूर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आले. आणि तिसऱ्यावेळी थेट कॅबिनेटमंत्रिपदापर्यंत अमित देशमुख पोहोचले.

> दोन वेळा मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणारे अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र होय. बालपणापासून सत्तेचे खेळ आणि कायम सत्तेच्या विविध पदांवर असणारे अशोक चव्हाण सकळ सत्तेचे कायमचेच सोयरे आहेत, असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही.

> गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि पंकजा मुंडेंचे चुलत बंधू असलेले धनंजय मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या मुशीत तयार झाले. भाजयुमोमध्ये मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आता कॅबिनेट मंत्रिपदावर त्यांनी झेप घेतली.

> जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत बडे नेते अंकुशराव टोपे यांचे पुत्र राजेश टोपे आघाडी सरकारमध्येही मंत्री होते. अंकुशराव टोपे आमदार आणि खासदार म्हणून निवडून आले होते.

> नगर जिल्ह्यातले बडे नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र शंकरराव गडाख थेट कॅबिनेटमंत्री झाले. गडाख कुटुंबाचे नगर जिल्ह्यात मोठं प्रस्थ आहे. नगर जिल्ह्यातला सत्तेच्या सोयऱ्यांचा गोतावळा या कुटुंबाने सांभाळलेला आहे.

> काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र असलेले विश्वजीत कदम यांनी राज्य काँग्रेसमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. भारती विद्यापीठाचे सचिव असलेले विश्वजीत कदम राज्यातल्या बड्या राजकीय कुटुंबातून येतात.

> मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांची कॅबिनेटमंत्रिपदी वर्णी लागली आहे. धारावी मतदारसंघातून सातत्याने निवडून येणाऱ्या वर्षा गायकवाडांना काँग्रेसने संधी दिली आहे. मात्र, मुंबईतून प्रतिनिधीत्व देताना काँग्रेसने घराणेशाहीच कायम ठेवली.

> खासदार आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे पहिल्यांदाच निवडून येऊन थेट राज्यमंत्री बनल्या आहेत. रायगड जिल्ह्यातले बडे प्रस्थ असलेल्या तटकरे कुटुंबानंही घराणेशाहीलाच प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

> माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजिव प्राजक्तने पहिलीच निवडणूक जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर जिंकलेल्या प्रसाद यांची थेट राज्यमंत्रिपदी वर्णी लागली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आदित्य यांना कुठले खाते मिळणार याचीही सगळ्यांनाच उत्सुकता लागला आहे. आदित्य ठाकरे हे मुंबईतील वरळी मतदारसंघाचे आमदार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 30, 2019 03:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading