मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Devendra Fadnavis: विंदा करंदीकरांच्या कवितेतून देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले...

Devendra Fadnavis: विंदा करंदीकरांच्या कवितेतून देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले...

Devendra Fadnavis takes dig on Maharashtra government : अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई मनपात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावरुनही शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 24 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीका केली. मुंबई मनपात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावरुनही शिवसेनेवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला आनंद आहे की, छोटंसं का होईना मुख्यमंत्र्यांचं भाषण आज आम्हाला ऐकायला मिळालं. विं. दा. करंदीकर यांची एक कविता आत्ताच्या सरकारच्या एकूण परिस्थितीवर ऐकावावी असं मला वाटतं. सरकारची नावाची यंत्रणा किती उदास झाली आहे आणि लोकांच्या प्रश्नांबाबत सरकारला घेणंदेणं नाहीये. नवे प्रकल्प नाहीत, नव्या योजना नाहीत. घोषणांची अंमलबजावणी नाही. केवळ टीका, आरोप टोमणे याच्या व्यतिरिक्त या सरकारच्या माध्यमातून काही होताना दिसत नाहीये. कवीवर्य विं. दा. करंदीकर म्हणतात, "सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते... माकडछाप दंतमंजन, तोच चहा, तिच गाणी, तेच मुर्ख तेच शहाणे सकाळपासू रात्रीपर्यंत तेच ते तेच ते..... खाणावळ्याही बदलून पाहिल्या कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं. काकूपासून ताजमहाल सकळीकडे सारखेच हाल.... नरम मसाला गरम मसाला, तोच तो भाजीपाला, तिच ती खवट चटणी, सुख थोडे आणि दु:ख फार... अशा प्रकारची अवस्था या सरकारची आपल्याला पहायला मिळते." वाचा : परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेली सर्व प्रकरणं CBI कडे वर्ग, सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्र सरकारला झटका देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आमचे मुख्यमंत्री असं बोलतात की प्रश्न विचारायला अक्कल कुठे लागते. आम्हाला हे आधी माहितीच नव्हतं. आम्ही सभागृहात अनेक प्रश्न विचारत बसलो होतो. आधी आम्हाला समजल असत तर आम्ही नसते विचारले प्रश्न. पण काही जणांना संसदेत जास्त प्रश्न विचारल्यामुळे संसद रत्न पुरस्कार मिळतो. काहींना इथे पुरस्कार मिळतो. पण आम्हाला आज समजलं की, प्रश्न विचारायला काही अक्कल लागत नाही. आमची चूक झाली की, मविआ ला आम्ही महाविकास आघाडी समजलो. नंतर लक्षात आलं की, महाविकास आघाडी नाही तर महाविनाश आघाडी.. मग लक्षात आलं महावसुली आघाडी पण अलिकडच्या काळात मद्यविकास आघाडी झाली आहे. म्हणजे किती दूरचा विचार करुन तुम्ही मविआ नाव ठेवलं ते आता लक्षात आलं असंही फडणवीस म्हणाले. पेट्रोल-डिझेलचा कर आपण कर कमी केला नाही. पण दारू वरील कर 50 टक्के केला, बार लायसन्सच्या नुतनीकरणावर 50 टक्के सूट दिली. नव्याने दारू विक्रीचा परवाना दिला. चंद्रपूरची दारू बंदी मागे घेतली. कोरोनाच्या काळात मंदिरे बंद होती आणि मद्यालय सुरू होती. क्लास बंद होती ग्लास सुरू होते. महाराष्ट्र मद्यराष्ट्र करण्याचं जे काम चाललं आहे... या संदर्भात अनेक विषय माझ्याकडे आहेत पण मला असं वाटतं की, एकच मुद्दा मला मांडावा वाटतो की, ज्यांनी व्यसनमुक्तीसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं त्या अनिल अवचट यांना सकाळी श्रद्धांजली दिली आणि दुपारी मंत्रिमंडळ बैठकीत सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री परवान्याचा निर्णय घेतला असंही फडणवीस म्हणाले.
First published:

Tags: Budget, Devendra Fadnavis, Uddhav thackeray

पुढील बातम्या