मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अधिवेशनाचा शेवट कडू! विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये 'या' मुद्यावरून जुंपली

अधिवेशनाचा शेवट कडू! विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये 'या' मुद्यावरून जुंपली

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये 'या' मुद्यावरून जुंपली

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये 'या' मुद्यावरून जुंपली

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज पूर्ण झालं. या संपूर्ण अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपलेली पाहायला मिळाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 मार्च : गेल्या तीन-चार दिवसांपासून विधिमंडळात राहुल गांधींचा मुद्दा या ना त्या कारणानं गाजतोय. नुकतेच सत्ताधारी आमदारांनी राहुल गांधींविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोडे मारो आंदोलन केलं होतं. त्याला काँग्रेससह विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला होता. विधानसभा अध्यक्षांनी त्या आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली. तर मोदींविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी आमदारांनाही तो नियम लागू करावा अशी मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. त्यामुळे या आंदोलनाच्या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये सामना रंगल्याचं पाहायला मिळालं.

सत्ताधाऱ्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात केलेल्या जोडे मारो आंदोलनचा मुद्दा शनिवारीही विधिमंडळात गाजला. आंदोलन करणाऱ्या सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली. अपमान करणाऱ्यांचं निलंबन केलं पाहिजे. ज्यांनी अपमान केला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रीय नेत्यांबाबत अपमानस्पद शब्द वापरले गेले, असा आक्षेप विरोधकांनी घेतला.

वाचा - 'ते कायदेतज्ज्ञ..' राहुल गांधींवरील कारवाई चुकीची म्हणणाऱ्या बच्चू कडूंना भाजप नेत्याने सुनावलं

विरोधकांनी सभागृहाबाहेर काळ्या फिती लावू निदर्शनं केली. तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधी बाकांवरच्या आमदारांवर कारवाईची मागणी लावून धरली. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर केंद्र सरकार विरोधात  जोरदार घोषणाबाजी केली होती. पंतप्रधान मोदींविरोधात  घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांवरही कारवाई करावी अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली.

या आंदोलनाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चा झाली. मात्र, त्यातून मार्ग निघू शकला नाही. त्यामुळे विरोधकांनी बहिष्कार अस्त्र उपसलं. आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. समोरून काही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. यांच्या मनाता काय आहे म्हणून आजच्या कामावर बहिष्कार टाकला आहे. आमच्याकडून काही चुकले असेल तर त्यांना सुद्धा निलंबित करा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.

First published:
top videos

    Tags: Budget 2023, Eknath Shinde