मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अधिवेशन सुरू होताच अवघ्या काही तासांतच भाजपचे सभात्याग

अधिवेशन सुरू होताच अवघ्या काही तासांतच भाजपचे सभात्याग


 'महाविकास आघाडीचा खरा चेहरा आज पाहायला मिळाला आहे.  पुरवणी मागण्यांमध्ये आम्हाला माहिती घेण्याचा अधिकार होता'

'महाविकास आघाडीचा खरा चेहरा आज पाहायला मिळाला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये आम्हाला माहिती घेण्याचा अधिकार होता'

'महाविकास आघाडीचा खरा चेहरा आज पाहायला मिळाला आहे. पुरवणी मागण्यांमध्ये आम्हाला माहिती घेण्याचा अधिकार होता'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 01 मार्च :  अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या  (maharashtra budget session 2021) पहिल्याच दिवशी वादळी ठरला आहे. भाजपने आक्रमकपणे बाजू मांडत ठाकरे सरकारवर हल्लाबोल सुरू केला होता.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अखेर या शाब्दिक वादात भाजपने सभागृह त्याग करण्याचा निर्णय घेतला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवशी मोठा गोंधळ पाहण्यास उडाला. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून अजित पवार यांनी भूमिका मांडल्यामुळे भाजपचे वैधनानिक मंडळाचा मुद्या मांडला. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शाब्दिक खडाजंगी उडाली.

'महाविकास आघाडीचा खरा चेहरा आज पाहायला मिळाला आहे.  पुरवणी मागण्यांमध्ये आम्हाला माहिती घेण्याचा अधिकार होता.  विदर्भ व मराठवाड्यासाठी निधी देण्याबाबत वैधनानिक विकास महामंडळाच जे  कवच असतं ते कवच आता राहिलेलं नाही. विदर्भ आणि मराठवाड्याचा अनुशेष महाविकास आघाडी भरून काढणार नाही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

तसंच, 'आमची अपेक्षा होती आणि नाना पटोले यांना मी विनंती केली की, तुम्ही विदर्भातील आहात आपल्याला निधी मिळत नाही.  तसंच मी अशोक चव्हाण यांना मराठवाड्याचे म्हणून विनंती केली. मात्र त्यांना खुर्चीसाठी सर्व काही सोडल आहे' अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केली.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 'समतोल विकासाचा विचार करुन या सरकारने निधीचं वाटप केलं आहे का? मला या सभागृहाच्या नियमांनुसार बोलण्याचा अधिकार आहे. मराठवाडा, विदर्भ या राज्याचा भाग आहे. डावपेचात वैधानिक विकास मंडळं अडकता कामा नये. तुम्ही सभागृहातले शरद पवारांचं भाषण जाहीर वाचून पाहा. अजित पवारांनी 15 डिसेंबर 2020 ला आश्वासन दिलं होतं की, मी वैधानिक विकास मंडळं स्थापन करुन देऊ, त्याला 72 दिवस झाले आहेत, ते करणार आहात की नाही ते सांगा, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला.

त्यानंतर अजित पवार यांनी उत्तर दिले. 'आमचं सरकार विदर्भ मराठवाडा विकास मंडळ झाले पाहिजे या मताचं आहे. 8 तारखेला बजेटमध्ये विकास मंडळांबद्दल जे ठरलं आहे त्याचे आकडे पाहायला मिळतील. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. 12 विधान परिषदेची नावं दिली आहेत. ज्या दिवशी ती नावं जाहीर केली जातील त्याचवेळी विकास मंडळं घोषित केली जातील' असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलायला उभे राहिले, 'अजितदादांच्या मनात होतं तेच ओठी आलंय. आमदारांच्या नावाखाली विकास मंडळं ओलीस ठेवलं जातंय. राज्यपाल कोणत्या पक्षाचे नाहीत, राज्याचे आहेत. अशी भाषा वापरु नका ती जनता तुम्हाला माफ करणार नाही. आमचं हक्काचं आहे ते आम्ही मागतोय, काही भिक मागत नाही.  जो काही संविधानाने अधिकार दिला आहे तो आम्ही मिळवणारच, मी अजितदादांच्या या वक्तव्याचा निषेध करतो' असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.

अखेर, अर्थसंकल्प जेव्हा सादर केला जाईल तेव्हा विकास मंडळांची घोषणा केली जाईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.

First published: