CM उद्धव ठाकरे आणि पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस देणार उत्तर, ‘सामना’ रंगणार

CM उद्धव ठाकरे आणि पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस देणार उत्तर, ‘सामना’ रंगणार

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीस बोलणार असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.

  • Share this:

मुंबई 26 जुलै:  माझं सरकार पाडून दाखवा असं भाजपला आव्हान देणारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत, त्यापूर्वी ‘सामना’तून लोकांना सत्तेचा दर्प चालत नाही अशी शरद पवार यांची टीका आणि देवेंद्र फडणवीस यांचा बहुचर्चित दिल्ली दौरा या पार्श्वभूमीवर राज्य भाजच्या कार्यकारणीची बैठक सोमवारी (27 जुलै) होत आहे. मुंबईत नसलेले सर्व नेते या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे उपस्थित राहतील. या बैठकीत देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तरे देण्याची शक्यता असून ते काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागणार आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकारिणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यांच्यावर होणाऱ्या सगळ्या टीकेला आता देवेंद्र फडणवीस काय उत्तर देणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. शरद पवारांची सामनातील मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग अशी त्रोटक प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली होती. कार्यकारिणीत सविस्तरपणे ते सर्व टीकेचा समाचार घेतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप या जुगलबंदीचा नवा अंक पाहायला मिळेल.

या बैठकीत राज्य सरकारला कोरोनाचा मुकाबला करण्यात आलेलं अपयश, दुधाचा प्रश्न, साखरेचा प्रश्न, निसर्ग वादळग्रस्तांना न मिळालेली सरकारी मदत यावर सरकारवर टीका करणार राजकीय प्रस्ताव मंजूर केला जाईल. याशिवाय 5 ऑगस्टला होणाऱ्या राममंदिर भूमीपूजनाबद्दलही प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे.

COVID-19: डायबेटिसच्या रुग्णांना जास्त काळजीची गरज, आढळून आलीत 2 नवी लक्षणे

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांच्या नियुक्तीनंतर जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीची पहिल्यांदाच बैठक होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे या बैठकीला व्हीसीद्वारे उपस्थित राहणार आहेत. भाजपाच्या मुंबईतील दादर येथील वसंतस्मृती या कार्यालयात सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे.

मुंबईसाठी Good News, ‘कोरोना टेस्ट’साठी सुरू होणार आता हायटेक लॅब

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वसंतस्मृती कार्यालयातून संबोधित करतील. तसंच मुंबई परिसरातील भाजपाचे पदाधिकारी दादर येथील वसंतस्मृती येथे उपस्थित राहणार असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, राज्यातील अन्य भाजपा खासदार, आमदार यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकारी आपापल्या ठिकाणाहून सहभागी  होणार आहेत.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 26, 2020, 10:39 PM IST

ताज्या बातम्या