'भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही', वाचा पत्रकार परिषदेतले 15 महत्त्वाचे मुद्दे

'भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही', वाचा पत्रकार परिषदेतले 15 महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपकडून सत्तेचा तिढा सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

मुंबई, 07 नोव्हेंबर : महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपकडून सत्तेचा तिढा सुटेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी अद्याप भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार नाही असं सांगितलं. दुसरीकडे मातोश्रीवर शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक पार पडली. त्यानंतर आता भाजप नेते राज्यपालांना भेटणार अशी चर्चा होती. यावर मुनगंटीवार यांनी भाजप सरकार स्थापनेसाठी दावा करणार नसल्याचं म्हटलं आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने शिवसैनिकच मुख्यमंत्री होणार, असे सांगितले. राज्यातील राजकीय कोंडीवर अनेक चर्चा होत आहेत. याच असे देखील बोलले जात आही की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा राज्याच्या राजकारणात येतील. यावर बोलताना गडकरी साहेब कधीच राज्याच्या राजकारणात येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर राज्यात स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. यासाठी शिवसेनेसोबत काही स्थरावर चर्चा सुरु असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेतील 15 मुद्दे

-शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रश्नच येत नाही

-जनादेशाचा आदर व्हावा एवढी माफक अपेक्षा

-उद्धव ठाकरे यांच्या सोबत भावाचे नाते

-काही स्तरावर शिवसेनेसोबत चर्चा सुरु

-भाजपा अल्पमतातलं सरकार बनवणार नाही

-आम्हाला महायुतीचं सरकार आणण्याची इच्छा आहे आज आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही

-नितीन गडकरी पुन्हा राज्यात येणार नाहीत

-प्रत्येक प्रश्नांला उत्तर देण्याची गरज नाही

-भाजप कितीही पावलं पुढे घेण्यास तयार

-काँग्रेसची भूमिका विरोधी पक्षात बसण्याची आहे

-राष्ट्रवादीची देखील हीच भूमिका

-शिवसेनेसोबतच युती केली पाहिजे दुसरा पर्याय शोधू नये

-राऊत शिवसैनिक समजतात, देवेंद्रजींच्या रुपान शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार

-संजय राऊत यांच्या भाष्याचा सन्मान करू, हा डेडलाॅक संपवण्याचा आम्ही प्रयत्न करू

-भाजप अन्य कोणत्याही पर्यायांचा विचार करणार नाही

निवडणुकीचे निकाल 24 ऑक्टोबरला लागले. त्यामध्ये कोणत्याच एका पक्षाला बहुमत मिळालं नाही. 288 जागापैकी भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी 54, काँग्रेसने 44 आणि इतर पक्ष आणि अपक्षांनी 28 जागा जिंकल्या. सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेला 145 चा बहुमताचा आकडा भाजप-सेना युतीने गाठला. मात्र त्यांच्यात सत्तेच्या वाटपावरून तणाव निर्माण झाला आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 12:35 PM IST

ताज्या बातम्या