Home /News /mumbai /

Devendra Fadnavis: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Corona पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

Devendra Fadnavis: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Corona पॉझिटिव्ह, ट्विट करुन दिली माहिती

Devendra Fadnavis tests positive for Covid19 : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

    मुंबई, 5 जून : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर होते मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी आपला दौरा अर्धवट सोडून शनिवारी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर आज त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. (Devendra Fadnavis tests positive for Covid19) देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं, "कोविड टेस्ट केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे आणि उपचार सुरू आहेत. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोविड टेस्ट करुन घ्यावी" शनिवारी सोलापूर दौरा रद्द करुन मुंबईला शनिवारी देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा रद्द करण्यात आला. फडणवीस यांना ताप असल्याने ते सोलापूर दौरा रद्द करुन मुंबईच्या दिशेला रवाना झाले. त्यानंतर ते संध्याकाळी मुंबईत दाखल झाले. शुक्रवारी मुंबईतील कार्यक्रम आटोपून रात्री लातूरच्या दिशेला निघाले. लातूरमध्ये आल्यावर शनिवारी सकाळीदेखील त्यांना ताप होता. त्यांनी औषधं घेतली होती. पण तरीही त्यांचा ताप कमी झालेला नव्हता. फडणवीस लातूरच्या कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांनी मंचावरुन भाषणही केलं. या कार्यक्रमादरम्यानच आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी फडणवीस यांना 102 इतका ताप असल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली होती. वाचा : राज्यसभा निवडणूक, भाजपकडून निर्णायक मतांची गोळाबेरीज झाली? राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातील सार्वजनिक ठिकाणी, तसेच बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या संदर्भात राज्याच्या आरोग्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटलं, राज्यात काही जिल्ह्यांत रुग्णवाढ होत आहे. त्यात मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. ज्या ठिकाणी रुग्णवाढ होत आहे त्या ठिकाणी आपण मास्क वापरण्याचं आवाहन करावं. मास्क सक्ती करण्यात आलेली नाहीये. त्यादृष्टीने 10 -15 दिवस रुग्णवाढ होत असलेल्या ठिकाणी आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरायला हवा. ज्यामध्ये बसेस, लोकल ट्रेन, ऑफिस, शाळा, सिनेमागृह, सभागृह, मॉल्स अशा ठिकाणी मास्क वापरावे. इतर ठिकाणी मास्क वापरण्यावर शिथिलता असावी.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Coronavirus, Devendra Fadnavis, Mumbai

    पुढील बातम्या