महाराष्ट्र बंद मागे, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

महाराष्ट्र बंद मागे, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमी प्रकाश आंबेडकरांनी पुकारलेला आजचा महाराष्ट्र बंद अखेर मागे घेतलाय,

  • Share this:

02 जानेवारी : भीमा कोरेगाव प्रकरणात आज दलित संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सगळ्याच ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. पण महाराष्ट्रातल्या सगळ्याि महत्त्वाच्या ठिकाणी शांतता आहे. मुंबईमध्ये तिन्ही मार्गावरच्या रेल्वे सेवा सुरळीत आहे. कोल्हापूरात एस टी वाहतूक सुरळीत सुरू आहे. सकाळच्या सत्रातील शाळाही सुरू आहे. गडहिंग्लज, कागल, जयसिंगपूर मध्ये जनजीवन सुरळीत आहे. कोल्हापूर शहरातील केएमटी वाहतूक बंद आहे. ठिक-ठिकाणी पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

पण आता काही ठिकणी वातावरण चिघळण्याचं संकेत दिसतायत. पुण्यामध्ये काही ठिकाणी शाळा बंद आहेत. रिक्षा, बसेस सुरु आहे आणि लोकंची वर्दळही आहे. ठाण्यामध्ये तिन-हात नाक्यावर आंदोलनाला सुरुवात झाली होती. रस्तारोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण महाराष्ट्र बंदच्या हाकेवर राजकीय पक्षांकडून शांतता राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

भीमा कोरेगाव तणावाचे राज्यभरात पडसाद उमटत आहे. भारिप संघटनेनं आज महाराष्ट्र बंदची हाक दिलीये. या पार्श्वभूमीवर आज स्कूल बस मालक-चालक संघटनेनं स्कूल बस न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शाळा मात्र सुरूच राहणार आहेत. शाळांना सुट्टी देण्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नकार दिल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिलीये.

आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, वसई-विरार जिल्ह्यातील शाळा सुरू असणार आहे. परंतु शहरातील सद्यस्थिती पाहता शाळेतील मुलांची सुरक्षितता आणि बसचे रक्षण करण्यासाठी सकाळच्या सत्रात स्कूल बस धावणार नाही, असा निर्णय स्कूल बस मालक-चालक संघटनेनं घेतला आहे.

दरम्यान, मुंबईत ही बंदची हाक दिली गेली. या बंद मुळे वाहतुकीवर परिणाम होतं आहे. पण सध्या  जागो जागी वाहतूक सुरुळीत चालू आहे. मुंबईच्या डबेवाल्यांवर या बंदचा परिणाम होतो. जर जेवणाचे डबे वेळेवर कार्यालयात पोचले नाहीत तर त्याचा उपयोग ही होत नाही. म्हणून आज मुंबईत जेवणाचे डबे पोचवण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे. भीमा-कोरेगाव येथील जी घटना घडली त्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात सामाजिक सलोखा कायम राखावा असं आवाहन मुंबईच्या डबेवाल्यांनी केलंय.

 

First published: January 3, 2018, 8:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading