मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Maharashtra band : बेस्ट आणि एसटी बसचा बंदमध्ये सहभाग, शिवसेनेच्या संघटनेचा पाठिंबा

Maharashtra band : बेस्ट आणि एसटी बसचा बंदमध्ये सहभाग, शिवसेनेच्या संघटनेचा पाठिंबा

शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाहतुकीवर उद्या परिणाम होणार आहे.

शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाहतुकीवर उद्या परिणाम होणार आहे.

शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाहतुकीवर उद्या परिणाम होणार आहे.

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 10 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये (Lakhimpur Violence case) शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारले होते. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील (mva government) तिन्ही पक्षांनी उद्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद (Maharashtra band ) पुकारला आहे. या बंदमध्ये मुंबईतील बेस्ट बस (best bus) आणि एसटी बसचा (st bus) समावेश असणार आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दोन्ही वाहतूक सेवा बंद राहणार आहे.

लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या तिन्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाराष्ट्र बंदची उद्या हाक दिली आहे. राज्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र बंदची तयारी होत आहे. शाळा आणि महाविद्यालय बंद असणार आहे. तर दुसरीकडे मुंबईची बेस्ट वाहतूक सेवाही बंद राहणार आहे. त्याच पाठोपाठ गावागावात पोहोचलेली एसटी बस सेवा सुद्धा बंद राहणार आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे वाहतुकीवर उद्या परिणाम होणार आहे.

तर दुसरीकडे, उद्याच्या बंदमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन सहभागी होणार नाही. बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असा शासनाचा निर्णय असताना बेस्ट बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही, बेस्ट कामगार सेना कर्मचाऱ्यांना बंदचे  आवाहन करून राज्य सरकारच्या निर्णयाचं उल्लंघन करत आहे, असा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे.

उठा उठा सकाळ झाली.. ; सईच्या Sunday Special फोटोशूटवर चाहत्याची भन्नाट कमेंट

अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्याचा अधिकार बेस्ट कामगार सेनेला कुणी दिला. कानगारांच्या अधिकारासाठी बंद पुकारला तर कारवाई होते, मग आता बंद केला तर कारवाई होणार नाही, याची खात्री सुहास सामंत देणार का? असा सवालही राव यांनी विचारला.

42 वर्षीय व्यक्ती विशीतील तरुणीच्या पडला प्रेमात, गावकऱ्यांनी अशी केली अवस्था

तर लखीमपूर खेरी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्हीही त्याचा निषेध करतो. परंतु, महाराष्ट्रात सरकार मधीलच पक्षांनीच महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे नेमके कोणते लॉजिक आहे कळत नाही. आधीच कोरोनामुळे गेले दीड दोन वर्ष व्यापारी आर्थिक संकटात आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत होतंय. त्यात असे बंद व्यापाऱ्यांना परवडणारे नाहीत  आणि निषेध करायचंय तर अन्य मार्ग आहेत त्याचा अवलंब करावा बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गाऱ्हाणं मांडायच तरी कोणाकडे ? या बंदमध्ये सामिल न होता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालु ठेवावी, असं आवाहन मनसेच्या  महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केलं आहे.

First published:

Tags: एसटी बस, महाराष्ट्र बंद