Home /News /mumbai /

खराब हवामानाचा फटका मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला, नियोजित पालघर दौरा रद्द

खराब हवामानाचा फटका मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला, नियोजित पालघर दौरा रद्द

आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

आपल्याला कोरोनाची तिसरी लाट टाळायची आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक नियम कठोरपणे पाळावे लागतील, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

CM Uddhav Thackeray Palghar tour cancelled: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आजचा नियोजित पालघर दौरा रद्द करण्यात आला आहे.

मुंबई, 19 ऑगस्ट : खराब हवामानाचा फटका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या दौऱ्याला बसल्याचं दिसून येत आहे. कालपासून मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात पावसाने सुरुवात केली आहे. तसेच आज मुंबई आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाावसाचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. आज मुख्यमंत्री पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पालघर दौऱ्यावर होते. मात्र, हेलिकॉप्टर उड्डाणासाठी वातावरण अनुकूल नसल्याने मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द (CM Uddhav Thackeray Palghar tour canceled) करण्यात आला आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता होणार होते. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टरने पालघरला दाखल होणार होते. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर उड्डाण करणं शक्य नसल्याने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. Jan Ashirwad Yatra: नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा; शिवसेना-राणे समर्थक भिडणार? त्यामुळे आता पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्धघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानाहून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. नियोजित वेळेनुसार दुपारी 12.30 वाजता हा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, मुंबई, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Palghar, Uddhav Thackeray (Politician)

पुढील बातम्या