Home /News /mumbai /

भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याने विरोधक आक्रमक, जाधवांना निलंबित करण्याची मागणी

भास्कर जाधवांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्याने विरोधक आक्रमक, जाधवांना निलंबित करण्याची मागणी

BJP demand suspension of Bhaskar Jadhav after PM Narendra Modi mimicry: विधानसभेत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

मुंबई, 22 डिसेंबर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly winter Session) सुरुवात झाली अशून पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. विधानसभेत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) नक्कल करुन दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं आणि त्यांनी भास्कर जाधव यांच्या निलंबनाची मागणी केली. नरेंद्र मोदी यांनी 50 -50 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात देईल असं म्हणाले पण काय झालं? असं म्हणत भास्कर जाधव यांनी पंतप्रधनांची नक्कल केली. यानंतर भाजपने आक्रमक होत भास्कर जाधव यांच्या विरोधात घोषणा दिल्या. भास्कर जाधावांनी माफी मागावी अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. तसेच भास्कर जाधव यांना निलंबित करा अशीही मागणी करण्यात आली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे सभागृहात नाहीत त्यांच्याविषयी आपल्याला बोलता येत नाही, कारण ते उत्तर द्यायला नसतात. मी चॅलेंज देतो की असं वक्तव्य माननीय पंतप्रधान यांनी केलंच नाही. देशाच्या पंतप्रधानांबद्दल असं म्हटलं जातंय हे आम्ही सहन करणार नाही. भास्कर जाधव यांना निलंबित करा पंतप्रधान यांची नक्कल कसे करू शकतात. वाचा : सोनिया गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन अंगविक्षेप करून नक्कल करण शोभनीय नाही. तुमच्या नेत्यांचा अवमान आम्ही करायचा का ? अंगविक्षेप केला तर माफी मागा नाहीतर त्या सदस्याला निलंबित करा अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यावर भास्कर जाधव यांनी म्हटलं, 15-15 लाख रुपये देणार असं पंतप्रधान कधी बोलले नाही असं विरोधक बोलतातय. ते शब्द फिरवतायत. ते पंतप्रधान होण्यापूर्वी बोलले. तसंच मी म्हणतोय, की ते पंतप्रधान झाल्यावर मी बोललो नाही तर पंतप्रधान होण्यापूर्वी काय बोलले हे बोललो याचा अर्थ मी पंतप्रधानांची नक्कल केली नाही तर एका उमेदवारीची नक्कल केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान सहन करणार नाही भास्कर जाधवांनी माफी मागितलीच पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली. यानंतर भास्कर जाधव यांनी म्हटलं, सभागृह स्थगित कऱण्याऐवजी आणि वक्तव्य तपासून घेण्याऐवजी मी माझे शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो. वाचा : "....तर उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकतात" : चंद्रकांत पाटील भास्कर जाधव यांनी केलेल्या या विधानावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, अंगविक्षेप मागे घेता येत नाही, शब्द मागे घेता येतात. अजूनही सदस्य गंभीर नाहीयेत. विरोधकांनी या मुद्द्यावरुन जोरदार गोंधळ घातला. यानंतर विधानसभेचं कामकाज 15 मिनिटांसाठी म्हणजेच दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. नेमकं काय झालं सभागृहात?  एका लक्षवेधी दरम्यान ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15-15 लाख रुपये देण्याचं आश्वासन करुन देण्याची आठवण करुन दिली. यानंतर वादाला सुरुवात झाली. देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा मंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Bhaskar jadhav, Devendra Fadnavis, Narendra modi, Winter session

पुढील बातम्या