Home /News /mumbai /

Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्ष आमचाच होईल, सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितला मतदानाचा आकडा!

Assembly Speaker Election : विधानसभा अध्यक्ष आमचाच होईल, सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितला मतदानाचा आकडा!

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारे लोक आहे, तसा त्यांचा गट आहे ते मतदान करतील.

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारे लोक आहे, तसा त्यांचा गट आहे ते मतदान करतील.

बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारे लोक आहे, तसा त्यांचा गट आहे ते मतदान करतील.

    मुंबई, 03 जुलै : शिंदे (eknath shinde) सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. शिवसेनेनं (shivsena)आपल्या सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटानेही व्हीप बजावला आहे. शिवसेनेचा व्हीप लागू होणार नाही, भाजपचे उमेदवाराला 165 ते 170 मतदान होईल आणि आमचेच उमेदवार विजयी होतील, असा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) यांनी केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. या निवडणुकीची पूर्ण तयारी झाली आहे. भाजप आणि शिंदे गटाचे आमदार विधानभवनाकडे रवाना झाले आहे.  भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी न्यूज18 लोकमतशी बोलत असताना भाजपचाच पक्षाध्यक्ष होईल असा दावा केला आहे. साधारण 11 वाजता अधिवेशन सुरू होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नवे आमदार परिचय होईल. त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्या नावावर आधी मतदान होईल. जर कुणी पोल मागितला तर पोल होईल.  नवे अध्यक्ष निवडले जातील. 165-170 मतदान अध्यक्षाच्या बाजूने होईल अशी अपेक्षा आहे, असं मुनगंटीवार म्हणाले. तसंच, व्हीप हा अध्यक्षाला लागू होत नाही. ते सद्सद विवेकबुद्धीने मतदान करतील तशी संविधानात तरतुद आहे. त्यामुळे व्हीप लागू होणार नाही. उद्धव ठाकरे गट असा आव आणत आहेत. पण तशी संविधानात तरतुद नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारे लोक तसा गट आहे ते मतदान करतील, असा टोलाही मुनगंटीवार यांनी सेनेला लगावला. 'दुर्देवी आहे की विधानसभा अध्यक्षपद इतके दिवस हे रिकामे राहिले. आम्ही मागणी केली होती पण त्याचवेळी केली नाही. जावई हा सत्याच्या बाजूने उभा आहे. त्यामुळे ही लढाई सासरे जावई असे नाही. तर सत्य असत्यांची आहे. जावयाने ठरवले आहे की ते धर्माच्या बाजूने आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले. 'अध्यक्षपद रिकामे ठेवणे हेच लोकशाही विरोधी आहे. त्यांच्या एकमत होत नव्हतं म्हणून त्यांनी निवडणूक घेतली नाही.  एका कुटुंबाला मात्र सगळे आपल्यासाठी वाटत होते. महाराष्ट्र म्हणजे मी असे यांचे मत होते,  असा टोला ही मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या