मुंबई, 06 जुलै : मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (pratap sarnik) यांनी विधानसभेच्या (Maharashtra Assembly Session) सभागृहातच आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल दाद मागितली. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असून माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहे. त्यामुळे सरकारने मला क्लिन चिट द्यावी, अशी मागणीच सरनाईक यांनी केली.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी सभागृहात फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थितीत केला. फोन टॅप प्रकरणी फक्त अधिकारी नाही पण मुख्यमंत्री पण होते का? अमली पदार्थबाबत सांगितलं आहे त्यांना माहीत नव्हतं का की मी खासदार होतो. गडकरी, दानवे, व बच्चू कडू यांचं नाव आहे. अमली पदार्थ तस्करीमध्ये नाव घातली गेली आहे, अशी माहिती सभागृहात दिली. या प्रकरणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवेदन देत बैठक बोलावली आहे.
भास्कर जाधवांची दुसऱ्या दिवशीही बॅटिंग, भाजपची अभिरुपविधानसभा बंद
2016-17 ला काही जणांचे फोन हे टॅप करण्यासाठी लावले होते. त्यात ACS होमकडे परवानगी घ्यावी लागते हे सांगवे लागले. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल कारवाई करण्यात येईल, अशी घोषणाही पाटील यांनी केली.
याच मुद्याला पकडून प्रताप सरनाईक बोलायला उभे राहिले. सरनाईक यांनी सभागृहात ईडीकडून होत असलेल्या कारवाईबद्दल आपली भूमिका मांडली.
मला ईडीकडून विनाकारण त्रास दिला जात आहे. लोकांना भुजबळ, अनिल देशमुख करेन अशी धमकी दिली जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या घोटाळ्याचा तपास हा ED ने घेतला. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझ्यावर आरोप होत आहे म्हणजे सरकारवरही होत आहे, असं सरनाईक म्हणाले.
'आई-बाबा मला माफ करा...' चिठ्ठी लिहून दहावीच्या विद्यार्थ्यानं सपवलं जीवन
तसंच, 'मी गृहमंत्र्यांना ते पत्र लिहिलं आहे की, घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईक अटक झाली पाहिजे पण जर घोटाळा झाला नसेल तर तो अहवाल बाहेर आणा नाहीतर क्लिनचिट द्या. जर मी गुन्हा केला असेल तर मला फासावर लटकवले पाहिजे, असंही सरनाईक म्हणाले.
दिलीप वळसे-पाटील यांनी यावर उत्तर देत म्हणाले की, 'मला सरनाईक यांनी निवेदन दिले आहे. EOW च्या माध्यमात काही केसेस आहेत का, MMRDA कडे माहिती मागवली आहे आणि तसे कळवले जाईल.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.