Home /News /mumbai /

Maharashtra Assembly Session : भास्कर जाधवांची दुसऱ्या दिवशीही बॅटिंग, भाजपची अभिरुपविधानसभा बंद

Maharashtra Assembly Session : भास्कर जाधवांची दुसऱ्या दिवशीही बॅटिंग, भाजपची अभिरुपविधानसभा बंद

भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता.

    मुंबई, 06 जुलै : पावसाळी अधिवेशनाच्या (Monsoon Session) दुसरा दिवसाची सुरुवात सुद्धा वादळी ठरली आहे. भाजपने (bjp) विधानभवनाच्या पायऱ्यांवर भाजपने प्रतिविधानसभा (Assembly) भरवण्यात आली होती. परंतु, सभागृहात सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर भाजपची प्रतिविधानसभा बंद करण्यात आली. भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व आमदारांनी पायऱ्यांवरच सभा भरवली होती. कालीदास कोळमकर यांना या विधानसभेचं अध्यक्ष करण्यात आले होते. यावेळी भाजपच्या आमदारांनी माईक घेऊन भाषण देण्यास सुरुवात केली होती. वीज तोडल्यानं महिला संतापली; MSEDCLच्या कर्मचाऱ्यांना मीटररुममध्ये ठेवलं डांबून विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करावे, मात्र माईकाचा वापर करणे योग्य नाही, असा आक्षेप राष्ट्रावादीचे नेते जयंत पाटील यांनी घेतला होता. त्यानंतर पुन्हा भास्कर जाधव यांनी तातडीने भाजपची विधानसभा बंद करण्याचे आदेश सुरक्षाअधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी भाजपच्या प्रतिविधानसभेत जाऊन माईक बंद पाडला आणि सभा घेण्यास मनाई केली. या कारवाईमुळे फडणवीस कमालीचे संतापले. सभा आटोपती घेत विधानभवनाच्या आवारातील पत्रकारांच्या दालनामध्ये फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठिय्या मांडला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या