मुंबई 24 फेब्रुवारी : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार हे आपलं पहिलं बजेट सादर करणार आहेत. सरकारला तीन महिने झाले आता आम्ही त्यांना जाब विचारणार असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या नेतृत्वात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केलं. सर्व आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
कामकाजाला सुरुवात होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला. तर अर्थमंत्री अजित पवार यांनी सुधारणा अध्यादेश मांडला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला तर भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.
फडणवीस म्हणाले, सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाहीये. केवळ 20 हजार जणांची यादी देणार आहे अशी फसवी घोषणा आहे. शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा प्रकार सुरु आहे. रोज महिलांवर अत्याचार सुरुच आहेत. त्या संदर्भात सरकारची संवेदनशीलता दिसत नाहीये. आम्ही हे विषय आज सभागृहात उपस्थित करणार आहोत. महाविकास आघाडी सरकारचे नेत्यांची सर्व आमदार यांची आज महत्त्वपूर्ण बैठक
दरम्यान महाविकास आघाडीचीही महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार यासह प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यात अधिवेशनाचं कामकाज आणि महाविकास आघाडी अजेंडा यावर चर्चा होणार आहे.
Sridevi Death Anniversary : आईच्या आठवणीत भावूक झाली जान्हवी कपूर
धनंजय मुंडे म्हणाले, अर्थसंकल्प मधून मोठा दिलासा मिळेल. भाजपने सत्तेत असताना शेतकरी फसवणूक केली. फडणवीस यांची कर्जमाफी भीक नको कुत्रा आवर अशीच राहिली होती. त्याचा पर्दाफाश करणार आहोत.