..तर मनसेचं 'इंजिन' 'घड्याळा'च्या काट्यावर धावणार!

..तर मनसेचं 'इंजिन' 'घड्याळा'च्या काट्यावर धावणार!

लोकसभा निवडणुकीत जे शक्य झाले नाही ते विधानसभा निवडणुकीत होऊ शकते.

  • Share this:

मुंबई, 02 मे: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक चर्चा कोणाची झाली असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची होय. लोकसभा निवडणूक न लढवता राज यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या. या सभांमधून त्यांनी मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच राज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाआघाडीचा एक भाग असेल असे बोलले जात होते. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. अर्थात राज यांनी त्याआधीच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.  राज्यात या वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांकडूनच अशी माहिती मिळाली आहे.

पाहा-VIDEO : राज ठाकरेंच्या सभांचा फटका कुणाला बसणार? काय आहे लोकांच्या मनात?

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला राज ठाकरे यांना सोबत घ्यायचे होते. पण राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना केलेला विरोध यामुळे काँग्रेसने त्यास नकार दिला होता. असे असले तरी राज यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप विरुद्ध प्रचार केला होता. मुंबईतील एका सभेत तर त्यांनी शिवसेनेला देखील मत देऊ नका, असे आवाहन केले होते.

लोकसभा निवडणुकीत राज सोबत असल्यास त्याचा फटका उत्तर भारतात बसू शकतो, असे काँग्रेस नेत्यांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी राज ठाकरे यांना सोबत घेण्यास नकार दिला होता. पण आगामी विधानसभा निवडणुकीत असा कोणताही मुद्दा असणार नाही, असे राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले.

वाचा- 'राज ठाकरेंवर टीका केली तर त्याला मारणारच, अनुभवायचं असेल तर बोलून बघा'

विधानसभा निवडणुकीत महाआघाडीतून राष्ट्रवादी त्यांच्या वाट्याला आलेल्या काही मनसेला देण्याची शक्यता आहे. मनसेच्या मते राज्यातील 30 मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे. अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसू शकतील.

अशी आहे विधानसभा निवडणुकीत मनसेची कामगिरी

मनसेला 2009च्या विधानसभा निवडणुकीत 13 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा मनसेने मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील मतदारसंघात विजय मिळवला होता. 2009च्या विधानसभेत राज यांनी शिवसेना आणि भाजपची मते घेतली होती. त्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीला पुन्हा सत्ता मिळाली होती. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास 2009मध्ये काँग्रेसने 21.01, राष्ट्रवादीने 16.37 आणि मनसेने 5.71 टक्के मते घेतली होती.

पण त्यानंतर झालेल्या 2014च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा मोठा पराभव झाला होता. तेव्हा मनसेला केवळ एकच जागा मिळाली होती.


VIDEO : 'या' 6 वेळा काँग्रेसच्या काळात झाला सर्जिकल स्ट्राईक!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 08:44 PM IST

ताज्या बातम्या