लढत विधानसभेची : वसई विधानसभेत हितेंद्र ठाकुरांचं वर्चस्व कायम राहणार का ?

लढत विधानसभेची : वसई विधानसभेत हितेंद्र ठाकुरांचं वर्चस्व कायम राहणार का ?

वसई, विरार, नालासोपारा या तिन्ही शहरांत बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळला तर इथे बहुजन विकास आघाडीचा विजय झाला आहे.

  • Share this:

वसई, 17 सप्टेंबर : वसई, विरार, नालासोपारा या तिन्ही शहरांत बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळला तर इथे बहुजन विकास आघाडीचा विजय झाला आहे. या लोकसभा निवडणुकीतही बहुजन विकास आघाडीला वसईमध्ये 11,309 मतांची आघाडी मिळाली होती.

असं असलं तरी या विधानसभा निवडणुकीत नालासोपाऱ्यातून शिवसेनेकडून एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मांची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे हितेंद्र ठाकूर नालासोपाऱ्यातून स्वतः उभे राहण्याची शक्यता आहे. वसईमधून ते त्यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर यांना उतरवू शकतात.

नालासोपारा विधानसभा शिवसेनेला गेल्याने वसईची जागा ही भाजपकडे जाईल, असं मानलं जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातून ख्रिस्ती उमेदवार देण्याची चाचपणी सुरू आहे.

वसई विधानसभेत विविध समाजाची लोकं आहेत. आगरी, कोळी, वाडवळ, कुणबी, कुपारी, कॅथलिक, मुस्लिम, गुजराती समाजाचं इथे प्राबल्य आहे. त्यामुळे ही सगळी समीकरणं लक्षात घेऊनच इथे उमेदवार द्यावा लागणार आहे.

लढत विधानसभेची : ठाण्यात ओवळा माजिवडामध्ये प्रताप सरनाईक यांची प्रतिष्ठा पणाला

वसईत महापालिकेतून गावं वगळण्याचा मुद्दाच मुख्य असतो. 2009 मध्ये वसई विरार महानगरपालिका स्थापन झाली. त्यात नवघर-माणिकपूर, वसई, विरार आणि नालासोपारा या 4 नगरपरिषदा आणि 52 गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र पश्चिम पट्ट्यातल्या 29 गावांनी महापालिकेत जायला विरोध केला. 2009 ची निवडणूक याच मुद्द्यावर शिवसेना पुरस्कृत उमेदवार विवेक पंडीत जिंकले होते. सध्या हे प्रकरण उच्च न्यायलयात आहे.

वसई विधानसभेत 2014 साली विवेक पंडीत यांचा पराभव झाला पण लोकसभेच्या निवडणुकीत विवेक पंडित यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात पडद्याआडून कामगिरी बजावली. सध्या तरी त्यांची वसईतून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही. पण पर्यायी उमेदवार मिळाला नाही तर इथून लढण्याची त्यांची तयारी आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीतलं मतदान

हितेंद्र ठाकूर (बविआ) – 97 हजार 291

विवेक पंडीत (अपक्ष)- 65 हजार 395

========================================================================================

VIDEO 'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान

Published by: Arti Kulkarni
First published: September 17, 2019, 8:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading